रेशनच्या धान्याचा काळाबाजार; ३२० पोती गहू पकडला 

अनिल कांबळे
Saturday, 21 November 2020

किराणा दुकानात ट्रकमधून २०० पोती गहू टाकण्यात आले. लगेच अन्न व धान्य विभागाचे अधिकारी चौरे यांना बोलविण्यात आले. त्यानंतर किराणा दुकानात छापा घालण्यात आला. दुकानातून ३२० पोती रेशनचा गहू जप्त करण्यात आला.

नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट चारने छापा घालून किराणा दुकानात रेशनचे धान्य उतरवत असताना ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणात किराणा दुकानदार आणि दुकानाचा दिवाणजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप रामभाऊ आकरे (३६ वर्षे, गरोबा मैदान) असे दुकानदाराचे तर बन्सी कुंजीलाल राऊत (३६, चंद्रनगर, एचबी टाउन, पारडी) असे दिवाणजीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफसीआय गोदामामधून रेशनचे धान्य अनेक दिवसांपासून काळ्याबाजारात विकण्यात येत होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी मंगळवारी सायंकाळी एफसीआय गोदामाजवळ सापळा रचला. दरम्‍यान, एक ट्रक गोदामातून निघाला. ट्रक महालमधील सीपी ॲण्ड बेरार कॉलेजजवळ थांबला. पोलिसांनीही ट्रकचा पाठलाग केला. तेथून ट्रक भरतवाडा येथील गुलमोहर नगर, कटरे ले-आउट येथील बळवंत किराणा दुकानासमोर थांबला. 

अधिक वाचा : खासगी रुग्णालयांचा असहकार, कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ

किराणा दुकानात ट्रकमधून २०० पोती गहू टाकण्यात आले. लगेच अन्न व धान्य विभागाचे अधिकारी चौरे यांना बोलविण्यात आले. त्यानंतर किराणा दुकानात छापा घालण्यात आला. दुकानातून ३२० पोती रेशनचा गहू जप्त करण्यात आला. दुकानदार प्रदीप रामभाऊ आकरे आणि दिवाण बन्सी राऊत यांच्याविरुद्ध पारडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय किरण चौगुले, हवालदार रमेश उमाठे यांनी केली. 

संपादन : मेघराज मेश्राम
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 320 bags of wheat were seized