उपराजधानी हादरली! रेल्वेच्या धडकेत दोघे ठार; वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गमावले प्राण 

योगेश बरवड 
Friday, 16 October 2020

मानकापूर व सोनेगाव हद्दीत या घटना घडल्या. तर विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारणे एका युवकाच्या जीवावर बेतले. लकडगंज हद्दीत युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर ः शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी प्राण गमावले. मेट्रोच्या कामगारासह दोघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. मानकापूर व सोनेगाव हद्दीत या घटना घडल्या. तर विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारणे एका युवकाच्या जीवावर बेतले. लकडगंज हद्दीत युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.

परराज्यातील रहिवासी असणारा अनुजकुमार यादव (२३) हा बांधकाम मजूर मेट्रो रेल्वेकडून सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कर्यरत होता आणि साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील शिवणगाव लेबर कॉलनीत वास्तव्यास होता. येथे राहणाऱ्या कामगारांच्या जेवणाची जवळच्या मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली आले. 

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

गुरुवारी रात्री ११ च्या सुमारात अनुजकुमार सहकाऱ्यांसोबत मेसमधून जेवण करून परतत होता. मोबाईलवर बोलत तो पुढेपुढे जात होता. नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग ओलांडत असताना गाडी येत असल्याचेही त्याच्या लक्षात आले नाही. रेल्वेने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

मानकापूर हद्यीतील ताजनगर झोपडपट्टी, इंदीरा मातानगर येथील रहिवासी राजेश दिलीप रवतेल (२५) हा गुरुवारी सायंकाळी घराजवळील नागपूर- दिल्ली रेल्वेमार्ग ओलांडत असताना रेल्वेने घडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले.

धंतोली हद्यीतील प्रियंकावाडी, गजानननगर येथील रहिवासी रतन प्रल्हाद कुंभरे (३०) हा रात्री आठच्या सुमारास वस्तीतील विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत असताना अचानक तोल गेल्याने विहरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - अरे व्वा... नागपूरहून वर्धा, चंद्रपूरला पोहचता येणार चाळीस मिनिटांत

 लकडगजं हद्यीतील बौध्दपुरा येथील रहिवासी कार्तिक लक्ष्मण मेश्राम (२९) याने घरी सिलिंग फॅनला साडीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 people are no more in different incidents in nagpur