
नागपूर : केंद्र शासनाने टाळेबंदी लावताना कोणताही विचार न करता तुघलकी निर्णय घेतला. सर्वच ठप्प झाल्याने अनेक कामगारांना पायीच आपल्या घरी जावे लागले. त्याच्या जखमा अद्यापही कामगारांच्या हृदयात खोलवर रुतलेल्या आहेत. त्यामुळे परराज्यातील घरी परतलेले ४० टक्के कामगार अद्यापही कामावर परतलेले नाहीत.
टाळेबंदीमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर नागपूरसह विदर्भातील उद्योगांचे चाक पुन्हा एकदा फिरू लागले आहेत. मात्र, उद्योगांना लागणारे मनुष्यबळ या कालावधीत त्यांच्या गावी परतल्याने अनेक उद्योगांना आता कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. त्यातच अडकलेल्या श्रमिकांसाठी केंद्राने रेल्वे सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात कामगार त्यांच्या गावी परतल्याने या संकटात आणखीच भर पडली आहे. विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात ५० टक्केच पोलादाचे (स्पॉन्ज आयरन) युनिट सुरू आहेत. या युनिटमध्ये काम करणारे कामगार त्यांच्या गावी परतल्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. कारखान्यातील स्टील बिलेटस आणि फर्नेस हाताळणारे बहुतांश कामगार हे परराज्यांतील होते. त्यांच्यापैकी अनेकजण गावी परतले असून, आता ते परतण्यास फारसे अनुकूल नाहीत. ते कसे परततील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने अशा कामगारांना काही भत्ते जाहीर करावेत, जेणेकरून ते कामाच्या ठिकाणी परततील, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कापड तयार करण्याचा उद्योग, बांधकाम व्यवसाय आणि वीजनिर्मिती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. या सर्वच क्षेत्रातील जवळपास ३० टक्के कामगार गावी परतल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वच उद्योगांना कामगारांचा प्रश्न भेडसावत आहे. यावर तोडगा म्हणून अनुभव नसलेल्या स्थानिक कामगारांना रोज़गार उपलब्ध करून दिला आहे. मात्र, त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण द्यायला आणखी वेळ लागणार आहे. राज्य शासनाने वीज दरात मिळणारी सवलत रद्द केल्यानेही उद्योजक अडचणीत आलेले आहेत. त्यासोबतच इंधनाचे वाढलेले भाव ही नवीन समस्या उद्योजकांसमोर आलेली आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने अनेक कंपन्यांनी थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे.
टाळेबंदीच्या काळात घरी परतलेले परराज्यातील कुशल व अकुशल कामगार अद्यापही उद्योगांमध्ये परतलेले नाहीत. या अडचणीसोबत कच्चा मालाचे वाढलेले भाव डोकेदुखी ठरू लागली आहे.
-नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.