नागपुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा पाचशेच्या घरात; आज १० रुग्णांचा मृत्यू 

राजेश रामपूरकर 
Saturday, 5 December 2020

कोरोनाची लागण झालेल्या ५२७ जणांमुळे आतापर्यंत विषाणूग्रस्त झालेल्यांची संख्या १,१४,२१८ वर गेली आहे. ३३९ जण आज कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंतचा आकडा १,०४,७३८ पर्यंत गेला आहे.

नागपूर ः मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढतच आहे. शनिवारी पाचशे रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या दहा बाधितांचा मृत्यू झाला.

कोरोनाची लागण झालेल्या ५२७ जणांमुळे आतापर्यंत विषाणूग्रस्त झालेल्यांची संख्या १,१४,२१८ वर गेली आहे. ३३९ जण आज कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंतचा आकडा १,०४,७३८ पर्यंत गेला आहे. उपचारादरम्यान दगावलेल्या १० जणांपैकी शहरातील ५, ग्रामीण भागातील २ आणि जिल्ह्याबाहेरील ३ रहिवाशांचा समावेश होता. कोरोनाची बाधित झालेले शहरात उपचारादरम्यान ३७२४ जण दगावले आहेत.

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

कोव्हिड १९ विषाणूची बाधा झाल्याचा संशयातून ५२०७ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील ४६८० जणांना विषाणू बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. नव्याने कोरोना विषाणूने गाठलेल्या ५२७ जणांमध्ये खासगी प्रयोगशाळेतून १६५ नमुन्यांमध्ये कोरोनाचा अंश असल्याचे निदान करण्यात आले. 

मेडिकलमधून १४८, मेयोतून ६०, विद्यापीठातून ५४, नीरी आणि अँटिजेन टेस्टमधून प्रत्येकी ३२, माफसुतून २० तर एम्समधून १६ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सध्या जिल्ह्यात ५७५६ सक्रिय कोरोनाबाधित विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील ४९१९ बाधित हे शहरातील आणि ८३७ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक आहेत. आजारातून मुक्तता होणाऱ्यांची संख्या साडे सातशेपेक्षा कमी झालेली आहे.

शनिवारची कोरोनास्थिती

पॉझिटिव्ह-५२७
कोरोनामुक्त- ३३९
एकूण बाधित- १,१४,२२८
एकूण आजारमुक्त-१,०४,७३८

मृत्यू- १०
एकूण मृत्यू- ३७२४
निगेटिव्ह-४६८०
सक्रिय बाधित- ५७५६ 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 corona patients today in Nagpur