बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप 

skeleton of man found behind buglow of ZP officer
skeleton of man found behind buglow of ZP officer

यवतमाळ : बियाणे कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. दोन) दुपारी येथील दारव्हा मार्गावरील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यामागील परिसरात उघडकीस आली. केवळ सांगाडाच आढळून आल्याने खळबळ उडाली. नातेवाइकांनी मृताचे कपडे ओळखले.

सुनील दयाराम घनबहादूर (वय 50, रा. वरूड जऊळका, जि. अकोला) असे मृताचे नाव आहे. सदर व्यक्ती बियाणे कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले. 

श्‍वानपथकालाही लगेच पाचारण करण्यात आले. श्‍वानाने दारव्हा मार्गावरील एका लॉजमागील बाजूपर्यंत माग काढला. लॉजच्या मागील बाजूस झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृतदेह कुजल्याने केवळ कपडेच शिल्लक होते. तर श्‍वानांनी मृतदेहाचे लचके तोडल्याचे दिसून आले. 

सुनील घनबहादूर यवतमाळ येथे 16 ऑक्‍टोबरलाच आले होते. तेव्हापासून ते लॉजमध्ये वास्तव्यास होते. सहा नोव्हेंबरपासून त्यांचा नातेवाइकांशी संपर्क तुटला होता. दरम्यान, पुतण्या आकाश घनबहादूर याने मिसिंगची तक्रार पोलिसांत दिली होती. बुधवारी सकाळीच ठाणेदारांची भेट घेऊन पुतण्या अमरावतीला पोहोचला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस येताच आकाशला यवतमाळला बोलावण्यात आले. 

त्याने कपड्यावरून मृतदेह काकाचा असल्याचा दावा केला. मात्र, डीएनए टेस्ट करावी लागणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृताची पत्नी अकोला येथे पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com