‘पाचपावली’, ‘एम्स’ लसीकरणात टॉपवर; नागपूर जिल्ह्यात ८८ टक्के लसीकरणाची नोंद

केवल जीवनतारे
Sunday, 24 January 2021

१२०० लस टोचण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यापैकी १ हजार ५६ जणांना लस टोचली. नागपूरच्या शहरातील पाच केंद्रावर लक्ष्याच्या तुलनेत ९४.४ टक्के तर ग्रामीण भागातील ७ केंद्रावर लक्ष्याच्या तुलनेत ८३.४२ टक्के लसीकरण नोंदवले गेले.

नागपूर : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी १२ केंद्र निवडण्यात आली आहे. मेडिकलमध्ये भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीची कोव्हॅक्सिन तर इतर केंद्रावर ऑक्सफोर्डची कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. शनिवारी मेडिकलमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले. ४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. त्या तुलनेत एम्स आणि पाचपावली येथील दोन्ही केंद्रावर प्रत्येकी १३३ कोरोना योद्ध्यांनी लस घेतली आहे. 

जिल्ह्यातील शहरी भागातील ४ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण ११ केंद्रांवर ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. या केंद्रांवर हळूहळू लसीकरणाचा टक्का वाढत आहे. शनिवारी शहरातील पाचपावलीतील सूतीकागृह रुग्णालयातील केंद्रात सर्वाधिक १३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. हा आजपर्यंतचा या केंद्रावरील उच्चांक आहे.

जाणून घ्या - ‘आत्महत्या’वार : विदर्भात तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; सोबत दोघांनी घेतला गळफास

एम्सच्या केंद्रावर १३३, मेयो केंद्रावर ८७, डागा केंद्रावर ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. ग्रामीणच्या हिंगणा केंद्रावर ८४, कामठी केंद्रावर ७४, काटोल केंद्रावर ९८, रामटेक केंद्रावर १०५, सावनेर केंद्रावर ८०, उमरेड केंद्रावर ४५, एन. के. पी. साळवे केंद्रावर ९८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसी घेतल्या आहेत.

१२०० लस टोचण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यापैकी १ हजार ५६ जणांना लस टोचली. नागपूरच्या शहरातील पाच केंद्रावर लक्ष्याच्या तुलनेत ९४.४ टक्के तर ग्रामीण भागातील ७ केंद्रावर लक्ष्याच्या तुलनेत ८३.४२ टक्के लसीकरण नोंदवले गेले.  शहरी व ग्रामीण मिळून जिल्ह्यात एकूण ८८ टक्के लसीकरण झाले. 

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

असे झाले लसीकरण

  • मेडिकल -४४
  • मेयो - ८७
  • एम्स -१३३
  • डागा - ७५
  • पाचपावली केंद्र -१३३

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 88 percent vaccination recorded in Nagpur district