हृदयावरील "बायपास'ला थांबा, काय असावी कारणे...

The ABG machine of the super specialty hospital is faulty
The ABG machine of the super specialty hospital is faulty

नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी हृदय शल्यक्रियाशास्त्र (सीव्हीटीएस) विभागातील एबीजी मशीन बंद असल्यामुळे येथील हृदयावरील बायपास शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लॉकडाउनमुळे काही दिवस कॅथलॅब यंत्रासाठी आवश्‍यक असलेले "यूपीएस' उपलब्ध न झाल्याने सुपरचे हार्ट फेल झाले होते. हे यंत्र सुरू झाले तर सुपरचा सीव्हीटीएस विभाग बंद आहे. केवळ एबीजी यंत्र बंद पडल्याने शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. चार ते पाच दिवसांपासून हे यंत्र बंद आहे.

सुपर स्पेशालिटीमध्ये गरिबांना वरदान ठरत असलेल्या हृदय विकाराच्या रुग्णांवर होणाऱ्या बायपास शस्त्रक्रियेसाठी डॉ. निकुंज पवार मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहे. परंतु येथे यंत्रसामूग्री पुरवताना प्रशासनाकडूनच हात आखडता घेतला जात असल्याची जोरदार चर्चा सुपर वर्तुळात आहे. लॉकडाऊनच्या काळात शस्त्रक्रियांवरही अंकुश आला आहे, बायपास आवश्‍यक असलेल्या रुग्णांसाठी जगण्यासाठी प्रतिक्षा यादी जोखमीची ठरू शकते. यामुळे प्रशासनाने तत्काळ येथे एबीजी यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी इंटकतर्फे करण्यात आली.

आदेश दिले आहेत
सुपर स्पेशालिटीतील सीव्हीटीएस विभाग गुणात्मक बदलातून ठणठणीत झाला आहे. इमर्जन्सी ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी असो की, बाय पास शस्त्रक्रिया याचे फायदे गरीब रुग्णांना होत आहेत. एबीजी यंत्राबाबत आदेश दिले आहेत.
-डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेषकार्य अधिकारी, सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com