एसीबीचे उपअधीक्षक तोतरे यांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पोलिस हवालदार बट्टलाल पांडे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पांडे हे 1988 ला शहर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले होते. कर्तबगार पोलिस कर्मचारी म्हणून बट्टू यांची ओळख आहे. त्यांना आतापर्यंत 341 रिवॉर्डस मिळालेले आहेत.

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक मिलिंद तोतरे आणि गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार बट्टूलाल पांडे यांना उल्लेखनीय पोलिस सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक घोषित करण्यात आले आहे. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर शहर पोलिस दलातून कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

मिलिंद तोतरे हे गेल्या 27 वर्षांपासून पोलिस सेवेत आहेत. बरेच वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबत नागपूर शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस हवालदार बट्टलाल पांडे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 

पांडे हे 1988 ला शहर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले होते. कर्तबगार पोलिस कर्मचारी म्हणून बट्टू यांची ओळख आहे. त्यांना आतापर्यंत 341 रिवॉर्डस मिळालेले आहेत. उल्लेखनीय कामगिरींमध्ये सक्‍करदऱ्यातील ट्रिपल मर्डर, पालटकर मर्डर केस, कुश कटारिया, हेमंत दियेवार, विजू मोहोड हत्याकांड, न्यायमंदिरातील चोरीचा पर्दाफाशही त्यांनी केला होता. यासोबत शहरातील एक कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी लकी खानला अकोला जिल्ह्यातून बट्टू यांनी अटक केली होती. अशा बऱ्याच तपासात बट्टूंची महत्त्वाची भूमिका आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB Deputy Superintendent Totare To them Presidential Medal