sakal

बोलून बातमी शोधा

Accident girl dies in Nagpur

सर्वांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर परत येण्यासाठी निघाले. घरी परतत असताना गौसी मानापूर शिवारात चालकाचे जिप्सीवरील नियंत्रण सुटल्याने जिप्सी पलटली. यात यश राहाटेसह शिवानी व मोहिनी या गंभीर जखमी झाल्या होत्या. तसेच अन्य चौघांनाही चांगलाच मार लागला होता.

मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : वाढदिवस हा सर्वांच्या आयुष्यातील मोठा दिवस असतो. तो प्रत्येकजण आपापल्या परीने साजरा करीत असतो. कोणी कुटुंबासह, कोणी मित्रांसह तर कोणी अनाथ, गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून देईल अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करीत असतात. वाढदिवसा साजरा करीत असताना काहीजण दारू पित असल्याने अनुचित घडना घडते. अशीच एक घटना नागपुरातही घडली... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी रवी गिरीपुंजे (वय 24, रा. छत्रपती चौक, नागपूर) हिचा पाच-सहा दिवसांपूर्वी वाढदिवस होता. कुटुंबासह वाढदिवस साजरा केल्याने ती मित्रांना वेळ देऊ शकली नाही. त्यामुळे तिने मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी बाहेर जाण्याचा आणि पार्टी करण्याचा बेत आखला होता. 

अवश्य वाचा - वडिलांची प्रकृती खराब झाली अन्‌ रुग्णालयातील महिलेशे जुळले सुत, मग केले हे...

28 फेब्रुवारीला बर्थडे गर्ल शिवानीसह यश राजेंद्र राहाटे (वय 22, रा. गोपालनगर, नागपूर), अविनाश अय्यर (वय 24, रा. विनायकनगर, नागपूर), आनंद गायधने (वय 24, रा. गोपालनगर, नागपूर), अंकित तुपकर (वय 24, रा. वर्धमाननगर, नागपूर), हर्षल ठवरे (वय 24, रा. मानेवाडा, नागपूर), मोहिनी माहूरकर (वय 24, रा. निरी कॉलनी, लक्ष्मीनगर, नागपूर) असे 22 ते 24 वर्ष वयोगटातील दोन मुली आणि पाच मुलं जिप्सी गाडीने वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाबा येथे जेवण करण्यासाठी गेले. 

सर्वांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर परत येण्यासाठी निघाले. घरी परतत असताना गौसी मानापूर शिवारात चालकाचे जिप्सीवरील नियंत्रण सुटल्याने जिप्सी पलटली. यात यश राहाटेसह शिवानी व मोहिनी या गंभीर जखमी झाल्या होत्या. तसेच अन्य चौघांनाही चांगलाच मार लागला होता. यशला उपचारासाठी वर्धा रोडवरील कल्पवृक्ष रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

जाणून घ्या - युवकाने ऑनलाईन बुक केली मसाज गर्ल... चांगलेच पडले महागात

अन्य जखमींना नजीकच्या विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते. हर्षल ठवरे हा जिप्सी चालवत होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद घिये करीत आहेत. अपघातात मृत पावलेला यश याचे वडील राजेंद्र राहाटे महापालिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. तरुण मुलगा गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

शिवानीनेही सोडले प्राण

वाढदिवसाची पार्टी करून परतत असताना झालेल्या अपघातात यशचा मृत्यू झाला. या अपघातात शिवानी व मोहिनी यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना उपचारासाठी विवेकानंद हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र, यशच्या पाठोपाठ रविवारी (ता. एक) शिवानीचा मृत्यू झाला. पाच-सहा दिवसांपूर्वीच तिचा वाढदिवस झाला होता. शिवानीच्या अपघाती मृत्यूने गिरीपुंजे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. 

go to top