महिला डॉक्‍टरांसह पाच जणांवर माथेफिरूने फेकले ऍसिड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

नागपूर : महिला डॉक्‍टरासह पाच जणांवर माथेफिरूने ऍसिड फेकल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील पहलेपार येथे गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. नीलेश कनेरे (22, रा. बाजारचौक, सवनेर) असे आरोपी माथेफिरूचे नाव आहे. सावनेरातील शासकीय आयटीआय पुढे कडकडी महाराज देवस्थानसमोर ही घटना घडली. 

काही दिवसांपूर्वीच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील दरोडा गावातील रहिवासी अंकिता पिसुड्डेवर रॉकेल टाकून युवकाने जाळले होते. सोमवारी (ता. दहा) तिचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. सर्वत्र रोष व्यक्‍त करण्यात येत होता. दरोडा गावातील नागरिकांनी रास्तारोको करून आरोपीला फाशी देण्याची मागणी रेटून धरली होती. 

अधिक वाचा - अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश

ही घटना घडून दोन दिवस उलटत नाही तोच महिला डॉक्‍टरांसह पाच जणांवर ऍसिड फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. मेडिकलतर्फे नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनसाठी सर्व्हे सुरू होता. यासाठी नागपुरातील तीन डॉक्‍टर सावनेरला गेले होते. त्यांच्यासोबत सावनेरातील दोन कर्मचारी होते. असे पाच जणांचे पथन सर्व्हेसाठी गावात फिरत असताना माथेफिरू युवकाने ऍसिड हल्ला केला. यात डॉ. सोफीया सोमण, सुकन्या कांबळे, शुक्रा जोशी, गवळी सोनेकर व सुरेखा बडे या पाचही जणांवर ऍसिड उडाल्याची माहिती आहे. जखमींना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपी माथेफिरू युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid thrown on female doctor by sacio