"ती' जायची धान रोवणीला; पती विकायचा मासे, दोघेही अडचणीत आल्यामुळे प्रशासन हादरले...

सतिश घारड
बुधवार, 15 जुलै 2020

नेहमीप्रमाणे "ती' दुस-याच्या शेतात धान रोवणीला जायची. तिच्या ध्यानीमनी नसताना ती चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळली. आणि मग तिच्यासोबतचे इतरही मजूर अडचणीत आले.
 

टेकाडी/कन्हान (जि.नागपूर)  : धान रोवणीला सुरूवात झाली आहे. गावातील महिला पुरूष धानरोवणीच्या कामाला मोठया प्रमाणात जात आहे. नेहमीप्रमाणे "ती' दुस-याच्या शेतात धान रोवणीला जायची. तिच्या ध्यानीमनी नसताना ती चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळली. आणि मग तिच्यासोबतचे इतरही मजूर अडचणीत आले.

अधिक वाचा : तरीही...टोलनाक्‍यावर होते, सक्‍तीची वसुली...

मंगळवारी पिपरी येथे चाचणी अहवालात एक 40 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली आहे. अशोकनगर येथील 53 वर्षीय इसम कोरोनाबाधित असल्याचे खासगी लॅबमधून पुढे आले आहे. बाधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती कन्हान मटण मार्केटमध्ये मासे विकायचा. त्याची दखल घेत मुख्याधिकारी यांनी तत्काळ मटण मार्केट गाठले. परंतु, तेथील मासेविक्रेत्यांनी तो इसम मासे विकत नसल्याचे सांगतात. नेमके कोण खोटे बोलतोय, हा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. अशात कामठी येथे झालेला कोरोनाचा उद्रेक बघता शहरात कामठी येथील मटण विक्रेत्यांसोबत नगर परिषद येथे कार्यरत कामठी येथील कंत्राटी कामगारांना बंद केल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली.
अधिक वाचा :खुद्‌द दोन पोलिस कर्मचारी अडकले जाळयात, काय केले होते त्यांनी...

दहा दिवसात ती गेली कुठे कुठे?
मंगळवारी 40 वर्षीय कोरोनाबाधित महिला ही काल "पॉझिटिव्ह' आलेल्या 65 वर्षीय महिलेच्या संपर्कातील असून, ही महिला सध्या शेतांमध्ये धानरोवणीच्या कामाला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. ही महिला मागील 10 दिवसांत कुठे कुठे कामाला आणि कुणाच्या संपर्कात आली होती, याचा तपास प्रशासन घेत असून, सध्या धानरोवणीला जाणाऱ्या 14 महिलांचे स्वॅब घेतले असता निगेटिव्ह आलेले आहेत. अशोकनगर येथे बाधित 53 वर्षीय इसम हा "मुंबई रिटर्न' असून, काही मित्रांसोबत 11 जुलै रोजी परत येऊन फेटरी येथे फॉमहाउसवर थांबला होता. 14 जुलै रोजी दोन्ही मित्रांनी सोबत जाऊन खासगी लॅबमध्ये स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता, हा इसम कोरोनाबाधित असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मंगळवारी सकाळी कळताच त्याला मेडिकल येथे "रेफर' करून घरी असलेल्या आईचे स्वॅब तपासात घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्यापर्यंत प्रलंबित आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीय आणि संपर्कातील लोकांना होमक्‍वारंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे आज रॅपिड अँटिजन टेस्ट आणि साध्या टेस्ट घेण्यात आल्या.

अधिक वाचा :  धक्‍कादायक : जिल्हयातील "हे' तालुके ठरले सदया "टॉपर', कशात ते वाचा...

पारशिवनी तालुक्‍यात एकूण 9 रूग्ण
सध्या पारशिवणी तालुक्‍यात एकूण बाधित 9 रुग्ण झाले असून, एक्‍टिव्ह कोरोना 7, मृत 1 तर सुधारित 1 असा अहवाल आहे. वाढता कोरोनाचा उद्रेक बघता मंगळवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पारशिवणी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेत कन्हान शहराला भेट दिली होती.

संपादन : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration was shaken as both of them were in trouble