धक्‍कादायक : जिल्ह्यातील "हे' तालुके ठरले सदया "टॉपर', कशात वाचा...

विजयकुमार राऊत
बुधवार, 15 जुलै 2020

हिंगणा तालुक्‍यातील बाधितांची संख्या वाढली. तिच परिस्थिती कामठी तालुक्‍यातही आहे. त्या खालोखाल काटोल तालुक्‍यात 58रूग्णांची नोंद झाली आहे. हिंगणा व कामठी तालुक्‍यात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाबरोबरच नागरिकही हादरले आहेत..

नागपूर  : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एमआयडीसीत कामासाठी लागणारे मजूर परप्रांतातून आणल्यामुळे हिंगणा तालुक्‍यातील बाधितांची संख्या वाढली. तिच परिस्थिती कामठी तालुक्‍यातही आहे. त्या खालोखाल काटोल तालुक्‍यात 58रूग्णांची नोंद झाली आहे. हिंगणा व कामठी तालुक्‍यात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाबरोबरच नागरिकही हादरले आहेत.

अधिक वाचा : फायनन्स कंपन्यांकडून छळ, ऑटोचालकांनी जिल्हाधिका-यांकडे केली "ही' मागणी....

हिंगण्यात27 मजूर "पॉझिटिव्ह'
हिंगणा तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 129च्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यात हिंगणा तालुका कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर आहे. हिंगणा तालुक्‍यात बुटीबोरी मिहान व हिंगणा एमआयडीसी परिसर येतो. दोन दिवसांपूर्वी इंडोरमा कंपनीत एका ठेकेदाराने बिहारमधून मजूर आणले होते. अकरा मजुरांपैकी एक कोरोनबाधित आढळून आला. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा सालेदाभा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पोही गावातील सिस्कॉन कंपनीत काम करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील एका ठेकेदाराने 42 मजूर एका गाडीत कोंबून आणले. याची माहिती तालुका आरोग्य विभागाला लागली.

अधिक वाचा : काम सुरू, रस्ता बंद आहे, मात्र आजकाल कुत्रंही तिकडे फिरकत नाही, काय आहे गोम...

कामठीत पुन्हा 27 रुग्ण आढळले
कामठी तालुक्‍यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, सलग सहाव्या दिवशी मंगळवारी शहरात 22 तर ग्रामीण भागातील चार तर छावणी परिषद क्षेत्रातील एक अशा एकूण 27 रुग्णांची भर पडल्याने तालुक्‍यात रुग्णाने शतक पार केले. ही संख्या 112 वर पोहोचली आहे. या रुग्णांपैकी 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 85 रुग्णांवर नागपुरात उपचार सुरू आहेत. न्यू कामठी परिसरातील छत्रपतीनगर येथे एकाच दिवशी 10 रुग्ण आढळून आल्याने हा परिसर "हॉटस्पॉट' ठरला आहे. शहरातील न्यू कामठी परिसरातील छत्रपतीनगर येथे, कामगारनगर, नया बाजार येथील प्रत्येकी दोन तर न्यू खलाशी लाइन, नागसेननगर, कदर झेंडा, तुमडीपुरा, कोळसाटाल, पारसी पुरा, बजरंग पार्क, राहुल बुद्धविहाराजवळील, कामठी छावणी परिषद क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असून, ग्रामीण भागातील येरखेडा तीन व रनाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

अधिक वाचा :  पावसाळा सुरू झाला...तुम्हाला माहित आहे का? कोणता पाउस मानला जातो हानीकारक

जिल्हयात आतापर्यंतची रूग्णसंख्या

तालुके    रूग्ण
हिंगणा   129
कामठी   112
काटोल    58
सावनेर     8
पारशिवनी      9
रामटेक  
   8

 

संपादन : विजयकुमार राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: "These" talukas in the district have become "toppers", what to read ...