'समृद्ध जीवनासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारा'

योगेश बरवड
Sunday, 11 October 2020

ग्रामयण प्रतिष्ठानच्या गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण व निर्मिती केंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. निसर्ग विज्ञान मंडळाच्या ‘नेत्रवन’ सेवा प्रकल्पावर हे केंद्र सुरू झाले.

नागपूर : देशात गो-विज्ञानावर आधारित सात हजारांहून अधिक प्रकल्प कार्यरत आहेत. ते एकत्रित येणे गरजेचे आहे. हाच सुखी व समृद्ध जीवनाचा मार्ग आहे. भारतात उपलब्ध असलेल्या गोवंश कार्याचा विचार केल्यास पाच हजार कोटींची वार्षिक उलाढाल शक्य आहे.  त्यासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा सहप्रमुख अजित महापात्र यांनी आज येथे केले.

विद्युत महामंडळाच्या अधिकारी संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन 

ग्रामयण प्रतिष्ठानच्या गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण व निर्मिती केंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. निसर्ग विज्ञान मंडळाच्या ‘नेत्रवन’ सेवा प्रकल्पावर हे केंद्र सुरू झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विहिंपच्या गेरक्षा विभागाचे केंद्रीय मंत्री सुनीलजी मानसिंहका, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर, नागपूर महानगर गोसेवा विभागचे प्रमुख हितेश जोशी, उद्योजक हेमंत अंबासेलकर, उमरेड संघचालक अरविंद हजारे व डॉ. दांडगे उपस्थित होते.

सुनील मानसिहंका यांनी हे केंद्र केवळ गोशिल्प तयार करण्यापुरते मर्यादित न राहता ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रास्ताविक वर्धा हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू चंद्रकांत रागीट यांनी तर संचालन निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विजय घुगे यांनी केले. या संपूर्ण सोहळ्याचे प्रसारण ग्रामायण प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरुन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adopt a cow-based lifestyle for a prosperous life