तब्बल 21 दिवस ते 102 कर्मचारीही होते जेलमध्ये बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये कार्यरत असलेले 102 कर्मचारी मागील 21 दिवसापासून जेलमध्येच होते. शेवटी आज त्यांची घर वापसी झाली अाहे. 1 मे पासून हे सर्व कर्मचारी  कोरोनामुळे कारागृहातच लॉक डाउन होते.

नागपूर :कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने कठोर धोरण अवलंबिले. बाहेरगावी असलेले तिथेच अडकले. एवढेच नव्हे तर जेलमध्ये कार्यरत कर्मचा-यांनाही स्थानबध्द करण्यात आले होते. नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये कार्यरत असलेले 102 कर्मचारी मागील 21 दिवसापासून जेलमध्येच होते. शेवटी आज त्यांची घर वापसी झाली अाहे. 1 मे पासून हे सर्व कर्मचारी  कोरोनामुळे कारागृहातच लॉक डाउन होते.

सविस्तर वाचा - कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा
कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात  कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता. त्या सात शिवाय नागपूर मध्यवर्ती या आठव्या कारागृहातील 102 कर्मचाऱ्यांना सुद्धा क्वारंटाईन करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला होता. तेव्हापासून 21 दिवस हे 102 कर्मचारी काराग्रुहातच होते. आज त्यांची घर वापसी  झाली असल्याची माहिती जेल अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 21 days workers back to home