Breaking : बाराव्या मृत्यूने नागपूर हादरले, अकोल्यातील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

राज्यातील पहिले कोविड हॉस्पिटल मेडिकलमध्ये तयार झाले, यामुळे वैद्यकीय संचालकांच्या शिफारशीनुसार महिलेस मेडिकलमध्ये रेफर केले. मात्र या कोविड हॉस्पिटल उभारताना येथे कोरोनासह इतर आजाराचे रुग्ण येतील, हे अपेक्षित होते, यामुळे हिमोडायलिसिसची सोय करणे आवश्यक होते.

नागपूर : शनिवारी (ता. ३०) झालेल्या दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या धक्क्यातून नागपूरकर सावरत नाही तोच रविवारी आणखी एक धक्का बसला. अकोल्यातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून या कोरोनाबाधित महिलेस मेडिकलमध्ये हिमोडायलिसिसाठी रेफर केले होते. मात्र मेडिकलने या कोरोनासह किडनी विकारानेही ग्रस्त महिलेस परस्पर मेयोचा दाखवला रस्ता होता. रविवारी (ता. ३१) सकाळी 6 वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

राज्यातील पहिले कोविड हॉस्पिटल मेडिकलमध्ये तयार झाले, यामुळे वैद्यकीय संचालकांच्या शिफारशीनुसार महिलेस मेडिकलमध्ये रेफर केले. मात्र या कोविड हॉस्पिटल उभारताना येथे कोरोनासह इतर आजाराचे रुग्ण येतील, हे अपेक्षित होते, यामुळे हिमोडायलिसिसची सोय करणे आवश्यक होते.

मेडिकलने नाकारलेल्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
विशेष असे की, मेडिकलमध्ये ही सोय होती,  हिमोडायलिसिसची सुविधा  बंद पडली. यामुळे या महिलेस मेडिकलने परस्पर "मेयो'त रेफर करण्याचा अफलातून प्रकार घडला. तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन यांनी मेडिकल भेटीत हिमोडायलिसिस सुरू करण्याचे निर्देश दिले होते, परंतु मंत्रीमहोदयाच्या सूचनेलाही मेडिकल प्रशासनाने हरताळ फासण्याचे काम केले.  शुक्रवारी (ता. 29) अकोला येथून रेफर महिलेस कदाचित मेडिकलमध्ये हिमोडायलिसिसचे उपचार मिळाले असते आणि मंत्री महोदयांच्या सूचनांचे पालन करीत हिमोडायलिसिसची  सोय असती तर महिलेस भटकंती करावी लागली नसती, तिचा जीव वाचू शकला असता.

या प्रकरणातून धडा घ्यावा
मेडिकलचे हिमोडायलिसिस बंद आहे. त्याचे या महिलेस कोरोनाची बाधा असल्याने खासगीत किंवा इतर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करणे शक्‍य नव्हते. यामुळे हिमोडायलिसिस साठी मेडिकल हाच पर्याय योग्य असल्याने वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सूचनेप्रमाणे मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. मेडिकलमध्ये दारिद्रय रेषेखालील गरीब किडनी विकाराच्या रुग्णांच्या सोयीसाठी तीन वर्षांपुर्वी हिमोडायलिसिसची सोय होती. परंतु हळूहळू मेडिकलचे किडनी युनिटचे काम थंडबस्त्यात पडले. मेडिकलमधील हिमोडायलिसिसच्या रुग्णांना डायलिसिससाठी "सुपर'चा रस्ता दाखवला जातो. आतातरी अकोल्यातील या महिलेच्या कोविड मृत्यूनंतर मेडिकल प्रशासनाने धडा घ्यावा.

लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी

शहरातील कोरोना हॉटस्पॉट 
नागपुरात पहिला कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट ठरला होता सतरंजीपुरा. येथे 119 रुग्ण आढळून आले आहेत. मात्र या हॉटस्पॉटला मागे टाकत मोमीनपुरा कोरोना बाधितांमध्ये नंबर वन झाला आहे. मोमीनपुरा येथे सुमारे 202 कोरोनाबाधित आढळले. तिसरा हॉटस्पॉट गड्डिगोदाम ठरला असून येथे 30 बाधितांची नोंद झाली आहे. शहरात नाईक तलाव हा चौथा हॉटस्पॉट तयार होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona patients dies in nagpur