esakal | यावरही लागतो म्हणे जुगार...पोलिसांचा पडला छापा
sakal

बोलून बातमी शोधा

This also means gambling ... Police raids

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश हा कोंबड्याच्या झुंजीवर जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक उपनिरीक्षक नागोराव इंगळे, हेडकॉन्स्टेबल कृपाशंकर शुक्‍ला, सुधाकर धंदर, देवेंद्र चव्हाण, अशिष,बबन, अजय रोडे यांनी शैलेशच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी शैलेश याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच कोंबडे व रोख जप्त केली.

यावरही लागतो म्हणे जुगार...पोलिसांचा पडला छापा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  गुन्हेशाखेच्या युनिट चारने लकडगंजमधील जुनी मंगळवारी भागात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार चालणाऱ्या अड्ड्‌यावर छापा टाकून तिघांना अटक केली. कुख्यात शैलेश हिरालाल करनुके (वय 30,रा. ढिवरपुरा ), खुशाल दिलीप बांडेबुचे (वय 23,रा. जुना बगडगंज ) व एहसान खान कदीर खान (वय 37,रा. बंगालीपंजा), अशी अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.

मुंढे इफेक्ट - साडेनऊच्या ठोक्याला कर्मचारी हजर!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश हा कोंबड्याच्या झुंजीवर जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहाय्यक उपनिरीक्षक नागोराव इंगळे, हेडकॉन्स्टेबल कृपाशंकर शुक्‍ला, सुधाकर धंदर, देवेंद्र चव्हाण, अशिष,बबन, अजय रोडे यांनी शैलेशच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी शैलेश याच्यासह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच कोंबडे व रोख जप्त केली.

शैलेश हा कुख्यात असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत. गत अनेक महिन्यांपासून शैलेश हा जुनी मंगळवारी भागात जुगार अड्डा चालवायचा. याबाबत परिसरातील नागरिकांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रारही केली. परंतु पोलिसांनी या अड्ड्‌याकडे दुर्लक्ष केले होते.अखेर नागरिकांनी गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर लगेच कारवाई झाली. शैलेश यांचे लकडगंज पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध आहे. त्यामुळे त्याच्या कोंबडा झुंजीवर लकडगंज पोलिस कारवाई करीत नव्हते. लकडगंज पोलिस दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेवटी पीआय अशोक मेश्राम यांना कारवाई करण्याची वेळ आली. गुन्हे शाखेने कारवाई करीत तिघांना अटक केली.