प्रत्येकवेळी माझ्या नोकरीवर प्रश्न का उपस्थित करता?, अमृता फडणवीस भडकल्या

टीम ई सकाळ
Wednesday, 27 January 2021

एका युजरने अमृता फडणवीस यांच्या राज्य सरकारने अ‌ॅक्सिस बँकेचा फायदा करून दिला, असा आरोप केला होता. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. एका युजरने अमृता फडणवीस यांच्या राज्य सरकारने अ‌ॅक्सिस बँकेचा फायदा करून दिला, असा आरोप केला होता. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले आहे. तुम्ही प्रत्येकवेळी माझ्या नोकरीवर प्रश्न का उपस्थित करता? असा सवाल अमृता यांनी युजरला विचारला आहे.  

हेही वाचा मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेला ‘राजकुमार’ आहे तरी कोण? त्याचा उपवास होता म्हणून बरं झाल असं का...

प्रत्येकवेळी अ‍ॅक्सिस बँकेतील माझ्या नोकरीचा आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या खात्यांचा संबंध का जोडला जातो. मी 18 वर्षांपासून अ‍ॅक्सिस बँकेत कार्यरत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत का आहेत? हा प्रश्न तुम्ही कधी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारला का? असेही त्या म्हणाल्या. 

हेही वाचा - पाच लाखांची लाच मागितल्यामुळे सहायक आयुक्ताला अटक; सिक्युरिटी गार्डचे वेतन काढण्यासाठी पैशाची मागणी

अमृता फडणवीस या महाविकास आघाडी सरकारवर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून निशाणा साधत असतात. त्यांनी २५ जानेवारीलाही ट्विट करत 'आरे'तील जंगलावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निशाणा साधला होता. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ट्विटला रिट्विट करत त्यावर आपल्याच कुऱ्हाडीने निसर्गावर वार केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amruta fadnavis angry on user on axis bank issue