sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh on crime rate in nagpur

एनसीआरबीने नुकताच गुन्हेगारीचा अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये देशात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर दाखविण्यात आले आहे. मात्र, खरंच नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे का? याबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिले आहे.  

बलात्कारासह खुनाच्या घटनांमध्ये घट होऊनही नागपूर गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर का? गृहमंत्री देशमुखांनी सांगितले कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : एनसीआरबीने जाहीर केलेला रिपोर्ट हा २०१९ चा आहे. तसेच त्यामध्ये लोकसंख्या चुकीची दाखविली आहे. नागपूर, कामठी आणि हिंगणा असे मिळून जवळपास ३० लाख लोकसंख्या आहे. मात्र, २५ लाखांवरच हा अहवाल दाखविण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार दुरुस्ती केल्यास गुन्हेगारीमध्ये नागपूरचा क्रमांक नक्कीच खाली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. आज नागपुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही...

कामठी, नवीन कामठी, हिंगणा हे पोलिस ठाणे नागपूर ग्रामीणमधून काढून नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एनसीआरबीने अहवाल तयार करताना तिन्ही पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समावेश केला आहे. मात्र, त्या भागातील लोकसंख्येचा समावेश केला नाही. त्यामुळे त्यांच्या विश्लेषणामध्ये तफावत दिसून येत आहे. यापूर्वीसुद्धा त्यांच्या विश्लेषणामध्ये तफावत आढळून आलेली आहे आणि त्याबाबत त्यांना कळविले आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

हेही वाचा - येणाऱ्या बाळासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी गेला बाप; मात्र, बाळ येण्यापूर्वी...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. हेलमेट न वापरणे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, अवैध वाहतूक यावर पोलिस करडी नजर ठेवून आहेत. तसेच अपघातांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. २०१९ मध्ये ७२० अपघात झाले होते, तर २०२० हीच संख्या घटून ५१५ वर आलेली आहे. खुनाच्या घटनांमध्ये दोनने घट झाली असून यंदा फक्त ८८ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे दरोड्यामध्ये वाढ झाली असून हे प्रमाण १९ वर पोहोचले आहे. घरफोडीच्या घटनांमध्ये देखील घट झाली असून २०१९मध्ये ८०१ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, तर २०२० मध्ये ६५८ घडल्या आहेत. तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये ९ टक्क्यांनी घट झाली असून  बलात्काराच्या घटनांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. 
 

go to top