
नागपूर : मुस्लिम धर्मियांचा वर्षातील पवित्र रमजान महिना 25 एप्रिलपासून सुरू होत आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे म्हणजेच उपवास ठेवतात. उपवासाच्या सहरी व इफ्तारमध्ये सफरचंद, पेंडखजूर यासह विविध फळांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे देशात आयात-निर्यातीवर बंधने आली आहेत. यामुळे आखाती राष्ट्रांतून पेंडखजूराची आयात बंद असून उलाढाल निम्म्याने कमी झाली आहे. दरवर्षी रमजान महिन्यात शहरात 100 टनांपेक्षा जास्त पेंडखजूर, फळांची विक्री होते. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, या वेळी ही उलाढाल निम्म्यावर येण्याची शक्यता असून भाव वाढण्याची भिती आहे.
भारतात रमजानमध्ये इराण, सौदी अरेबिया आदी देशांमधून मोठ्या प्रमाणावर पेंडखजूर व सफरचंदाची आयात होते. यंदा कोरोनामुळे आयात व निर्यातीवर बंधने आली आहेत. यामुळे अपेक्षित आयात होण्याची शक्यता नाही. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही मार्केटमध्ये पेंडखजूर, सफरचंदसह विविध फळे मिळणे शक्य नाही. परिणामी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनाही आवश्यक पेंडखजूर, सफरचंद मिळणे शक्य नाही. यामुळे उपलब्ध असलेली फळे चढ्या भावात विकण्याची शक्यता आहे. यासाठी मुस्लिम धर्मियांना घरातच शेवयासह विविध पदार्थ बनवून इद साजरी करावी लागणार आहे. सध्या कलिंगड, द्राक्षे, खरबूज, केळी यासह इतर स्थानिक फळांवरच उपवास सोडावा लागेल. रमजान महिन्याच्या आधीच लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजगार बुडाले आहेत. यामुळे यंदा मुस्लिम बांधवांना साध्या पध्दतीनेच रमजान इद साजरी करावी लागणार आहे.
रोजगार घटल्याने फळविक्रीही घटेल
नागपूर शहरासह परिसरात रमजानच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात फळांचा खप असतो, परंतु महिनाभरापासून नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे रमजान महिन्यातफळे उपलब्ध असली तरी बाजारामध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमीच विक्री होईल. सध्या बाजारात संचारबंदीमुळे ग्राहक नसल्याने फळांना आवश्यक भाव मिळत नाही, अशी माहिती काही फळविक्रेते व व्यापाऱ्यांनी दिली. संचारबंदीच्या काळात बाजार बंद असल्याने रमजाननिमित्त डोअर टू डोअर फळे, पेंडखजूर विकावे लागणार आहे.
सविस्तर वाचा - चौघे परिचारिकेच्या खोलीत शिरले अन पैशाची मागणी करीत केले हे कृत्य
यंदा विक्री 50 टक्केच
उपराजधानीत प्रतिवर्षी 100 टनांपेक्षा जास्त फळे व पेंडखजूर विक्री होते. यंदा मात्र ती पन्नास टक्क्यांपेक्षा कमी होईल. इराण व आखाती देशांमध्ये लॉकडाऊन व निर्यात धोरण बंद आहे, त्यामुळे धंदा मंदावला आहे.
रूहान बागवान, विक्रेता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.