
कोरोनाच्या लढाईत योद्धाप्रमाणे रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेला घरमालकाने घरभाडे त्वरित देण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच घर खाली करण्याची धमकी दिली. माणुसकीला कलंक लावणारी घटना गणेशपेठमध्ये घडली. याप्रकरणी परिचारिका राजश्री राजेश यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चौघे परिचारिकेच्या खोलीत शिरले अन् पैशाची मागणी करीत केले हे कृत्य
नागपूर : कोरोना... कोरोनामुळे तुम्ही घराबाहेरही निघत नाही... कुणाला घरीही येण्यास मनाई केली असालच... उगाच रिक्स कशाला... बरोबर ना... तुम्ही अजून कुण्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आले नाही तरी तुम्हाला कोरोनाची इतकी भीती वाटत आहे... खरं आहे ना... मग विचार करा... आपल्या देशातील पोलिस, डॉक्टर्स, परिचारिका आदी आपल्या जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करीत आहेत. आपण घराबाहेरही निघण टाळत असताना ते दिवस-रात्र अशा रुग्णांच्या संपर्कात राहून लढा देत आहेत... अन् आपण त्यांनाच अपमानित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. असाच एक प्रकार नागपुरात देखील घडला आहे.
आपल्या देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून देशात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेरही निघणे कठीण झाले आहे. सरकारनेही अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. यातून मात्र डॉक्टर्स, पोलिस, परिचारिका, सफाई कामगार यांना वगळण्यात आले आहे. त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना काम करावे लागत आहेत.
सविस्तर वाचा - तू सांग किती पैसे पाहिजे, फक्त माझी इच्छा पूर्ण कर...
कोरोनाचे रुग्ण आणि अन्य रुग्णांवर कोणत्याही परिस्थितीत उपचार झाला पाहिजे, याच विचारातून डॉक्टर्स रुग्ण सेवा देत आहेत. दिवस-रात्र ते केरोनाशी दोन हात करीत आहेत. एकाही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी त्यांचा आटापीटा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. त्यांना फ्रंटलाईन वॉरिअर्स असे देखील संबोधल आहेत. त्यांच्या सन्मानासाठी एक दिवस टाळी वाजवा आंदोलन करण्यात आले होते. देशातील प्रत्येक नागरिकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला मान देत फ्रंटलाईन वॉरिअर्सचा सन्मान केला होता.
मात्र, नागरिकांना आता याचा विसर पडत असल्याचे नागपुरात घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही भाडेकरून घराबाहेर काढू नका असे आवाहन केले आहे. तसेच त्यांना पैशांसाठी तगादा लावण्यास मनाई केली आहे. तरीही लोक सुधरायला तयार नाही. कोरोनाच्या लढाईत योद्धाप्रमाणे रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेला घरमालकाने घरभाडे त्वरित देण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच घर खाली करण्याची धमकी दिली. माणुसकीला कलंक लावणारी घटना गणेशपेठमध्ये घडली. याप्रकरणी परिचारिका राजश्री राजेश यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चौघांनी चढवला हल्ला
राजश्री सुरेश या कर्नलबाग परिसरात भाड्याची खोली करून राहतात. त्या डागा हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. कोरोनामुळे घराबाहेर निघणे कठीण झाले असताना त्या दिवस-रात्र रुग्णांची सेवा करीत आहेत. अशाही कठीण काळात घरमालक संजय भागवत, अलका भागवत, गौरी आणि सोनू भागवत हे बुधवारी दुपारी राजश्री यांच्या खोलीत शिरले. त्यांनी घरभाडे त्वरित देण्याची मागणी केली. मात्र, राजश्री यांनी आर्थिक स्थितीचा हवाला देत पुढच्या महिन्यापर्यंत थांबण्याची विनंती केली. मात्र, चौघांनी अचानक राजश्री यांच्यावर हल्ला चढविला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जाणून घ्या - Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन् पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र...
तुझ्यामुळे आम्हालाही कोरोना होईल
कोरोनासारख्या कठीण काळात एकजुटीने उभ राहण्याची गरज असताना नागरिक एकमेकांचा तिरस्कार करीत असल्याचे दिसून येत आहे. विनाकरण भाडेकरूंना त्रास देऊन घराबाहेर काढण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. जर भाडेकरू डॉक्टर, परिचारिका असेल तर त्यांना अधिकच त्रास दिला जात आहे. राजश्री यांनाही नाहक त्रास देत घराबाहेर करण्याचा प्रयत्न घरमालकांडून करण्यात आला. त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. "तुझ्यामुळे आम्हालाही कोरोना होईल' असे म्हणत घर खाली करण्याची धमकी दिली. यानंतर घरमालक खोलीतून निघून गेले.
देशात अनेक ठिकाणी हल्ले
कोरोनाच्या काळात देशातील अनेक भागात डॉक्टर्स, पोलिसांवर हल्ले झाले आहेत. रुग्ण सेवेसाठी हे डॉक्टर्स व पोलिस सेवा देतच आहेत. हल्ला झालेल्या परिसरातही ते जाण्यास तयार आहेत. ते आला धर्म अजून विसरलेले नाहीत. मात्र, नागरिक त्यांच्यावरच हल्ला चढवित आहेत. यांनी एकाच वेळेस बहिष्कार टाकला तर काय होईल याचा विचार करण्याची गरज आहे. असे ते करणार नाही हे जरी खरे असले तरी नागरिकांनी आपली माणुसकी दाखवायला हवी.