कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षण संस्थांकडून परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वच महाविद्यालये आणि इंटरनेट कॅफे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणे अशक्‍य आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती स्वीकारून अर्ज करण्याची तारीख 31 मार्च वरून 30 एप्रिल करण्यात आली आहे.

नागपूर : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सर्वत्र "लॉकडाऊन' करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे 31 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षांच्या नोंदणीसाठी तारखा वाढविण्यात आल्या आहे. त्यासाठी शिक्षण संस्थांनी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाकडून प्रॅक्‍टीकल असाईनमेंटसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वच महाविद्यालये आणि इंटरनेट कॅफे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणे अशक्‍य आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती स्वीकारून अर्ज करण्याची तारीख 31 मार्च वरून 30 एप्रिल करण्यात आली आहे. यासाठी नागपूर विभागीय कार्यालयाद्वारे पत्र काढण्यात आले असून त्यात थेअरी आणि प्रॅक्‍टीकलचे वर्ग 31 तारखेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. तसेच असाईमेंट 30 एप्रिलपर्यंत जमा करता येतील.

रेडियोवरुन केले संबोधित
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राचे संचालक डॉ. शिवस्वरुप यांनी ज्ञानवाणीच्या माध्यमातून सर्वच अध्ययन केंद्रांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. इग्नूद्वारे 31 मार्चपर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.

सीएस परीक्षेचे अर्ज करा 5 एप्रिलपर्यंत
आयसीएसआयद्वारे जून महिन्यात घेण्यात येणाऱ्या सीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे अर्ज 5 एप्रिलपर्यंत भरता येणार आहे. विलंब शुल्कासह 15 एप्रिल भरता येतील. यासंदर्भात संस्थेने अधिकृतरित्या संकेतस्थळावर माहिती प्रकाशित केली आहे.

एटीएनची हेल्पलाइन
युजीसी नेट, जेईई, नीट, कॅट यासारख्या देशातील बऱ्याच मोठया परीक्षांचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए)ने परीक्षार्थ्यांचे प्रश्‍न आणि समाधानासाठी हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. यात 8700028512, 8178359845, 9650173668 , 9599676953, 8882356803 या क्रमांकावर विद्यार्थी संपर्क करू शकतात.

सविस्तर वाचा - पोलिस इन ऍक्‍शन मोड! रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप, उठाबशांचीही शिक्षा

परीक्षा-हेल्पलाइन नंबर

  • यूजीसी-नेट : 0120-6895200
  • जेईई : 0120-6895200
  • नीट : 0120- 6895200
  • कॅट : 0120- 6895200
  • दिल्ली यूनिवर्सिटी प्रवेश परीक्षा : 011- 27667092, 011-27006900
  • इग्नू : 0120-6895200
  • जॉईन्ट सीएसआयआर-यूएफसी नेट: 0120-6895200

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Application forms of verious examinations can fillup after due date