लठ्ठ आहात का? मधुमेह पण आहे? हे नक्‍की वाचा

Are you obese? Is diabetes even? Read this copy
Are you obese? Is diabetes even? Read this copy

नागपूर :  भूक ही केवळ मानसिक आहे. आपण जिभेचे गुलाम झालो आहोत. सहज मिळतं म्हणून खूप खातो. चुकीच्या जीवनशैलीने आयुष्यात आजारांची जणू देणगीच दिली आहे. पारंपरिक जीवनशैलीची कास धरल्यास निरोगी आयुष्य जगता येईल. जीवनशैलीत योग्य बदल केल्यास लठ्ठपणा आणि मधुमेहाला दूर सारता येईल, असा आहार-विहाराचा आरोग्यदायी मंत्र प्रसिद्ध आहारतज्ज्ञ तसेच लाइफस्टाइल गुरू डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी आज नागपूरकरांना दिला.


दैनिक "सकाळ'ने सतराव्या वर्षात दमदार पाऊल ठेवले आहे. वर्धापनदिनाच्या पर्वावर रविवारी सुरेश भट सभागृहात डॉ. दीक्षित यांचा "लठ्ठपणा व मधुमेह दूर करा' विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी तब्बल दोन तास सुदृढ आरोग्य ठेवण्याचा सोपा "डायटप्लान' नागपूरकरांपुढे मांडला. महिलादिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी विषयाला हात घाला. ज्या घरातील आई जागरूक, ते घर नेहमीच निरोगी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्री-पुरुषांमध्ये समप्रमाणातच लठ्ठपणा दिसतो. लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर ही समस्या दिसून येत आहे. लठ्ठपणातूनच पुढे मधुमेह होतो. यामुळे येणारा काळ अधिक भयावह ठरण्याची शक्‍यता आहे. यामुळे लठ्ठपणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आपले वजन इतरांनी कमी करावे, अशी आपली अपेक्षा असते. पण, आपणच आपल्या वजनाची जबाबदारी घ्यायला हवी. तरच वजन कमी करता येईल. पण, मधुमेहींनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आपल्या मनाने डायट प्लानचे अनुसरण करू नये असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, वय, लिंग, आनुवंशिकता, शारीरिक श्रमाचा अभाव, सामाजिक आर्थिक स्थिती आदी लठ्ठपणाने कारण आहेत. आपण आवश्‍यकतेपेक्षा जास्त खातो, शारीरिक श्रम करीत नाही. रक्तामधील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा येतो. जेवणाच्या वेळा पाळायला हव्या. वजन वाढायला काही दिवस लागतात तसेच वजन कमी करायलासुद्धा काही दिवस लागतील. व्यायाम कुठल्याही वेळी करता येतो. पण, त्यात किमान 45 मिनिटांचे सातत्य असावे. हे व्याख्यान आरोग्यदायी जीवन जगण्याची प्रेरणा देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांच्या प्रश्‍नांना मनमोकळ उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.


डॉ. श्रीकांत जिचकारांची प्रेरणा

डॉ. दीक्षित यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी इतरांप्रमाणे मीसुद्धा अनेक व्यायाम केले, कसरती केल्या. उपवास केले. डायट प्लॅन तयार केले. मात्र, त्यातून कोणताही फायदा झाला नाही. नागपूरकर डॉ. श्रीकांत जिचकार यांचे "आहार' या विषयावर व्याख्यान यूटूबवर एकले. पुन्हा एक उपाय म्हणून सहज तीन महिने तो सातत्याने पाळला आणि काय आश्‍चर्य, आठ किलो वजन कमी झाले. यातूनच आयुष्याला दिशा मिळाली. डॉ. जिचकारांचा सल्ला आरोग्यदायी ठरला. यामुळे स्वत:तील झालेला बदल पाहून इतरांनाही मोफत सल्ला देण्याचा कार्यक्रम सुरू केला. म्हणूनच हा उपक्रम जिचकार यांच्या स्मृतीला अर्पण असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.

डॉ. दीक्षित यांचा डायट प्लॅन

  • - कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखून केवळ त्याच दोन वेळी जेवा.
  • - जेवण 55 मिनिटांच्या आतच संपवा.
  • - दोन जेवणांमध्ये काहीच खाऊ नका.
  • - जेवताना शक्‍यतो गोड कमी खा किंवा टाळा.
  • - जेवणातील प्रथिने वाढवा यामध्ये मोड आलेली कडधान्ये, चीज, पनीर घेता येईल.
  • -दोन जेवणांदरम्यान केवळ पाणी, ताक, ग्रीन टी, नारळ पाणी, विनासाखरेचा चहा, टोमॅटो सॉस घेता येईल.
  • - दिवसातून कधीही साडेचार ते पाच किलोमीटर चाला.
  • - तीन महिन्यांत याचा अपेक्षित परिणाम दिसून येईल.

सकाळसोबत अनेक वर्षांचा ऋणानुबंध

सकाळ आणि माझा अनेक वर्षांचा संबेध आहे. सकाळ परिवारातील अनेक लोकं माझ्या डायट प्लॅनचे अनुकरण करतात. विधायक बातम्या, उपक्रमांना सकाळकडून प्रसिद्धी दिली जाते, त्यासाठी सकाळचे आभार आणि अभिनंदन. हिंदी अनुवादित "विनाप्रयास वजन घटाये' पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले, त्यासाठीही आभार मानत डॉ. दीक्षित यांनी निर्मल समूहाच्या सहकार्यातून नागपुरात मधुमेह मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com