esakal | चर्चा तर होणारच! आशीष देशमुखांनी गाठले पाकिस्तान, काय असेल कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Deshmukh meets President of Pakistan

अहसान यांचे आजोबा मियॉं अहसान हे पाकिस्तानी चित्रपट सृष्टीच्या संस्थांपकांपैकी एक आहेत. सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांचे आणि अहसान यांच्या कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध आहेत. सिन्हा यांच्या आग्रहास्तव देशमुख हे सुद्धा लग्न समारंभात सहभागी झाले होते, असे कळते. 

चर्चा तर होणारच! आशीष देशमुखांनी गाठले पाकिस्तान, काय असेल कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पुलवामा हल्ला तसेच काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशात काटोलचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख थेट पाकिस्तानात जाऊन आल्याने कॉंग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रापती यांचीही भेट घेतली. 

सुप्रसिद्ध अभिनेते तसेच भाजपचे माजी खासदार शत्रुध्न सिन्हा यांच्यासोबत ते गेले होते. विशेष म्हणजे खासदार नवज्योतसिंग सिद्ध यापूर्वी पाकिस्तानला गेले होते. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्याने त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली होती. आशीष देशमुख पाकिस्तानातील व्यावसायिक मियॉं असद अहसान यांच्या लग्नासाठी गेले होते. 

तू दुसऱ्याशी लग्न करू नको; माझ्याशी संबंध ठेव, तुझा व मुलीचा पूर्ण खर्च उचलतो

अहसान यांचे आजोबा मियॉं अहसान हे पाकिस्तानी चित्रपट सृष्टीच्या संस्थांपकांपैकी एक आहेत. सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांचे आणि अहसान यांच्या कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध आहेत. सिन्हा यांच्या आग्रहास्तव देशमुख हे सुद्धा लग्न समारंभात सहभागी झाले होते, असे कळते. 

दौऱ्याची खमंग चर्चा

दरम्यान लाहोर येथे त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरीफ अल्वी यांची भेट घेतली. ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात आशीष देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आशीष देशमुख आक्रमक विदर्भवादी म्हणून ओळखले जातात. विदर्भाच्या मुद्यावर त्यांनी भाजपला जेरीस आणले होते. आता कॉंग्रेसचे नेते म्हणून त्यांनी केलेल्या पाक दौऱ्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.