शिवसेनेकडे नाहीत फारसे पर्याय; आशीष जयस्वाल नवे वनमंत्री?

Ashish Jaiswal new forest minister Nagpur political news
Ashish Jaiswal new forest minister Nagpur political news

नागपूर : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे नवे वनमंत्री म्हणून रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांचे नाव आघाडीवर आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आशीष जयस्वाल शिवसैनिक असून, त्यांनी रामटेकमधून सलग तीनवेळा निवडणूक जिंकली आहे. मोदी लाटेत पराभूत झाल्यानंतरही ते शिवसेनेत राहिले. भाजपने त्यांना रामटेक विधानसभेची ऑफर दिली होती अशी अफवाही जोरात होती. विधानसभेत युती झाल्याने भाजपने सेटिंग-गेंटिगचा फॉर्म्‍युला वापरून तत्कालीन आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.

युतीत शेवटच्या टप्प्यात बिनसल्याने जयस्वाल यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबासुद्धा होता. निवडून आल्यानंतर जयस्वाल यांनी कुठलीही सौदेबाजी केली नाही. थेट शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. पहिल्याच मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. भाजप-सेना युतीच्या काळातही ते याच मंडळावर होते.

जयस्वाल यांची बाजू अधिक जमेची

संजय राठोड विदर्भातील होते. त्यामुळे नवा मंत्री नेमताना शिवसेना विदर्भातीलच आमदाराचा विचार करेल असा तर्क व्यक्त केला जात आहे. विदर्भातील मंत्रिपद द्यायचे झाल्यास शिवसेनेकडे फारसे पर्याय नाहीत. आमदार संजय रायमूलकर आणि भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. भोंडेकर हेसुद्धा अपक्ष निवडून आलेले आहेत. त्यांच्या तुलनेत जयस्वाल यांची बाजू अधिक जमेची आहे.

वर्चस्व टिकवण्यासाठी विचार करावा लागले

रामटेकमध्ये कृपाल तुमाने खासदार आणि आशीष जयस्वाल आमदार आहेत. तुमाने दोनवेळा तर जयस्वाल चौथ्यांदा निवडून आले आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला जयस्‍वाल यांचा विचार करावा लागले असे एका नेत्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com