लॉकडाउनमध्ये कबूतरने लावले भांडण आणि निघाले हे...

Assault by two gangster at Nagpur
Assault by two gangster at Nagpur
Updated on

नागपूर : कबूतर... कबूतर हा सर्वांना आवडणारा पक्षी आहे. जेवढं प्रेम पोपटला मिळते तितकेच प्रेम कबूतरालाही मिळत असते. राजा-महाराजांच्या काळात कबूतरचा वापर माहिती पोहोचवण्यासाठी करण्यात येत होता. राजा कोणतीही सूचना दूर असलेल्या आपल्या सेनापतीला किंवा सैन्याला कबूतराच्या माध्यमातून पाठवित असायचा. तेव्हापासूनच कबूतरचा वापर संदेश पोहाचवण्यासाठी होऊ लागला. आता मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कबूतरचा वापर होत नाही. मात्र, हाच कबूतर एकाच्या जिवावर उठल्याची घटना नागपुरात घडली. 

कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, 
पहले प्यार की पहली चिट्ठी हो... 
पहले प्यार की पहली चिट्ठी हो... 
साजन को दे आ... 

हे गाण तुमच्या लक्षात असलेच. यातून कबूतर कसा माहिती पोहोचवतो हे दाखवण्यात आले आहे. तसेच अनेक चित्रपटांमध्ये कबूरची भूमिका दाखवली गेली आहे. आज यांचा वापर माहिती पोहोचवण्यासाठी होत नसली तरी त्यांच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. 

अनेक नागरिक शौक म्हणून कबूतर पाळतात. अनेकांच्या घरी आपल्याला कबूतर दिसून येतो. तर अनेक जण कबूतरचा वापर पैज लावण्यासाठी करतात. कबूतरच्या पैजवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. कबूतरच्या पैजमुळे अनेक जण श्रीमंत झाले तर अनेक जण गरीब झाले आहेत. आतातर कबूतरच्या पैजवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यांना पाळणारे काही कमी नाही. अशाच एका कबूतरमुळे एकाच्या जिवावर येऊन बेतली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, रस्त्यावर कबुतर ठेवल्यामुळे झालेल्या वादात दोन कुख्यात गुंडांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी युवकावर सध्या उपचार सुरू आहे. ही थरारक घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता भांडे प्लॉट चौकात घडली. राजू रामदास ठवरे (वय 40) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी कुख्यात शुभम दिलीप सातपैसे व नेहाल नागोसे या दोघांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चोवीस तासांपूर्वीच भांडे चौकात दोघांनी एका व्यावसायिकाचा खून केला होता, हे विशेष...

विरोध केल्याने लाठीहल्ला

राजू ठवरे हा कबूतर पाळतो. नेहमीप्रमाणे तो बुधवारी सकाळी कबूतरांच्या पेटीजवठ उभा होता. यावेळी काही कबूतर रस्त्यावर होते. काही वेळानी ठवरेजवळ शुभम व निहाल आले. दोघांनीही ठवरेला कबूतरची पेटी हटविण्यास सांगितली. मात्र, ठरवरने पेटी हटविण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या शुभम व निहाल या दोघांनी काठीने ठवरे याच्यावर हल्ला केला. यात ठवरे हा जखमी झाला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. 

तिघेही गुन्हगारी प्रवृत्तीचे

आरोपी शुभम व नेहाल हे कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे. तसेच राजू ठवरे हा सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी शुभम व नेहाल दोघांवरही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com