फेसबुक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; आरोपी फरार

अनिल कांबळे
Monday, 2 November 2020

तिला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जवळपास दोन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर नीलेशने तिला लग्नासाठी ताटकळत ठेवले. २२ ऑक्टोबरला तिने लग्नाबाबत तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली.

नागपूर : फेसबुकवरून फ्रेंडशिप झाल्यानंतर युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नीलेश संजय रामटेके (३१, रा. आरबीआय कॉलनी, काटोल रोड, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

गिट्टीखदान पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही गोकुळपेठमध्ये राहते. नवीन मोबाईल घेतल्यानंतर तिने फेसबुकवर अकाउंट उघडले. तिला आरोपी नीलेश रामटेके याने २१ मार्च २०१८ ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ॲक्सेप्ट करताच त्याने चॅटिंग सुरू केली. तिनेही त्याच्याशी चॅटिंग केली. त्याने कंत्राटदार असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक मागून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

अधिक वाचा - कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

तिला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जवळपास दोन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर नीलेशने तिला लग्नासाठी ताटकळत ठेवले. २२ ऑक्टोबरला तिने लग्नाबाबत तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on Facebook friend girl