कर्तव्यावर असलेल्या मुख्याधिका-यांवरच चढविला हल्ला, कोणी, का व कशासाठी? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

मुख्याधिकारी भेलावे यांनी सर्व दुकानदारांना दुकान हटविण्यासाठी सक्ती केल्याने दुकानदारांनी उलट मुख्याधिका-यांवरच हल्ला चढविला. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले. काही समाजसेवक व पत्रकारांनी पुढाकार घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांनी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व स्थितीवर नियंत्रण मिळविले.

सावनेर (जि.नागपूर):  कोरोना संसर्गाला मात देण्यासाठी डयूटीवर असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांवर रस्त्यावरील भाजीविक्रेते व अतिक्रमणधारकांनी हल्ला चढविला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचा : नागपुरात कोरोना सुसाट

भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण
गडकरी चौक ते बाजारलाईन परिसरातील भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करुन मुख्य मार्ग पूर्णतः बंद पाडला. रहदारीला त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच मुख्याधिकारी रविंद्र भेलावे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रस्त्यावरील गर्दी हटविण्याला सुरुवात केली. यावेळी अनेक दुकादारांच्या तोंडावर मास्क नव्हते. दुकानात सॅनिटाईझर नव्हते. सोबतच "सोशल डिस्टनिंग' न पाळता दुकानाला दुकाने खेटून होती. सोबत दहा वर्षाखालील मुले व वयोवृद्‌ध कोणतीही सुरक्षा, उपाययोजना न करता व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. मुख्याधिकारी भेलावे यांनी सर्व दुकानदारांना दुकान हटविण्यासाठी सक्ती केल्याने दुकानदारांनी उलट मुख्याधिका-यांवरच हल्ला चढविला. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले. काही समाजसेवक व पत्रकारांनी पुढाकार घेऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांनी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व स्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेचा सर्वंच स्तरावरून निषेध नोंदविल्या जात असून गडकरी चौक ते बाजर चौक येथील मुख्य रस्त्याच्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांस दुकाने लाऊ न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे यांच्यावर हल्ला चढविणा-यांवर कायदेशीर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

आणखी वाचा : आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार

दोषीवर कारवाई करण्यात येईल
या प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिका-यांवरच असे दुर्दैवी प्रसंग ओढावत असतील तर त्यांनी आपले कर्तव्य करावे कसे व ते कुणाकरिता? कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी या सर्व उपाययोजना ते करीत आहेत.
अशोक कोळी
ठाणेदार, सावनेर

निंदनिय प्रकार आहे
मागील तीन महिन्यांपासून शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्थानिक नगर प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन रात्रंदिवस एक करत आहेत. अश्‍यात कर्तव्यावर असलेल्या अधिका-यावर भ्याड हल्ला सावनेर शहराकरिता निंदनीय बाब आहे.
रविंद्र भेलावे
मुख्याधिकारी, सावनेर, न.प.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attacks on duty chiefs