"करोना'पेक्षा अफवांचाच "व्हायरस'; शब्दावरच "सेन्सॉरशीप' घालण्याची गरज

Attempts to push the market through the corona
Attempts to push the market through the corona

नागपूर : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या "करोना'बाबत भारतात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविली जात आहे. असामाजिक तत्त्वांकडून भारतीय बाजारपेठेला धक्का देण्यासाठी "करोना'ची भीती पसरविण्याची शक्‍यता बळावली आहे. एकूणच अफवांचाच "व्हायरस' जास्त धुमाकूळ घालत असल्याने चीनप्रमाणे "करोना' या शब्दावरच "सेन्सॉरशीप' घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

असामाजिक तत्वे या "करोना व्हायरस'चा "ऑनलाईन गैरफायदा' घेत देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याची नागरिक म्हणून प्रत्येकानेच दखल घेत कुठलीही अफवा किंवा शास्त्रीय माहिती नसेल तर कुठलीही पोस्ट शेअर करताना विचार करण्याची गरज सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे.

जगभरात आतापर्यंत 17,388 लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला असून, यातील 17,205 नागरिक चीनमधील आहेत. व्हिनेगर पिण्यामुळे कोरोना व्हायरसवर परिणाम होणार नाही, सकारात्मक रहा काहीच होणार नाही, कॅफिन पिऊ नका, यामुळे धोका वाढू शकतो, अशा अफवा सोशल मीडियावर फसरविणाऱ्यांवर कारवाई करीत चिनी सरकारने 250 लोकांना तुरुंगात टाकले. जगभरात 2.2 अब्जावर नागरिक प्रति महिना फेसबुक हाताळत आहे. परंतु, चीन सरकारने "फेसबुक'वर कठोर "सेन्सारशिप' लावली आहे.

चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहितीवरील बातम्या आपल्या देशात सुद्धा पाठवण्यात येत आहे. यावरही सेन्सरशीप आवश्‍यक आहे. मद्यपान करणाऱ्याला "करोना व्हायरस'चा धोका नाही, "अब कैसा रोना, एक पेग मे पॅक होगा करोना', असे स्लोगन बाजारात दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोनाबाबात मार्गदर्शक तत्त्वामध्ये अल्कोहोलचा उल्लेख आहे. परंतु कोरोना व्हायरस दारू पिण्यामुळे बरा झाला, असे कुठेही नमुद नाही.

"करोनाव्हायरस' हा फक्त लसूण मिश्रित पाणी पिल्याने दूर होतो, फक्त काही विशिष्ट प्रकारचे "मास्क' वापरल्यास या आजाराचा संसर्ग होत नाही, सुपर मार्केट, बाजारपेठा व भाज्यांची दुकाने या संसर्गाची उगमस्थाने आहेत, चीनमधून ई-मेलद्वारे येऊ शकतो, हा आजार लिफाफ्यातून किंवा पत्राद्वारे पसरवता येतो आदी अफवा पसरविल्या जात आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसावा, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आर्थिक संबंध, प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने करोना व्हायरसचा संबंध थेट भारतीय उद्योग व नागरिकांसोबत जोडण्यात येत आहे. विमानतळ, बस स्थानके, रेल्वे इत्यादी ठिकाणी भीतीदायक वातावरण पसरवायचा प्रयत्न सुरू असल्याचे पारसे यांनी नमुद केले. फेसबुक व इंस्टाग्रामवर "करोना व्हायरस' हा शब्द आल्यास ब्लॉक किंवा प्रतिबंधित करणे, त्यानंतर संबंधित पोस्टमधील माहितीबाबत तपासणी करणे आवश्‍यक आहे. करोनाव्हायरस अमेरिकेचा चीनविरुद्ध जैविक शस्त्र आहे, अशा बातम्याही पसरवली जात आहे, सृष्टीचा अंत आहे, अशा बातम्या येत असून यापासून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेअर बाजारावर परिणाम
जगातील शेअर बाजारावर कोरोना व्हायरसचा विपरित परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत शेअर बाजार गडगडल्यानंतर आज देशातही शेअर बाजाराला उतरती कळा लागली. काही मिनिटांमध्ये देशातील काही कोट्यवधी गमवावे लागले. आज सकाळी शेअर बाजारात 1448 अंशाने घसरण नोंदविण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत 5.50 लाख कोटीचे नुकसान सहन करावे लागले.

करोनाची नव्हे नकारात्मकतेची भीती
सोशल मीडियाच्या नकारात्मक वापरामुळे करोना व्हायरसची भीती वाढतच चालली आहे. यावर नियंत्रणही सोशल मीडियाच्या सकारात्मक मार्गानी शक्‍य आहे. अन्यथा या आजाराच्या अफवांचे लोण देशातील अर्थव्यवस्थेवर, पर्यटनावर व सामाजिक सुरक्षेवर आघात करणारे ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- अजित पारसे,
सोशल मीडिया विश्‍लेषक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com