मेयोत रुग्णांच्या जीवाला धोका? अद्यापही नाहीत प्रशिक्षित 'ड्रेसर'

autoclave and dresser posts are still vacant in indira gandhi government medical college nagpur
autoclave and dresser posts are still vacant in indira gandhi government medical college nagpur

नागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) सुरू झाल्यापासून येथे 'ड्रेसर'पासून तर परीट आणि ऑटोक्‍लेव्ह परिचर पदांची आस्थापना करण्यात आली नाही. मेयो प्रशासनाने ही पदे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. अप्रशिक्षितांच्या भरवशावर कामे सुरू असल्यामुळे रुग्णांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मेयोमध्ये सुरुवातीला ५९२ खाटा होत्या. आता खाटांची संख्या वाढली असून ती साडेआठशेवर पोहोचली आहे. शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली आहे. कोविड रुग्णालय उभारले आहे. रुग्णालयात ओपीडीतील किरकोळ शस्त्रक्रियागारासह प्रत्येक ओटीमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी ड्रेसिंग करण्याची गरज आहे. मात्र, याकडे प्रशासनातर्फे लक्ष देण्यात आले नाही. मेयोत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ही पदे भरण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे वारंवार प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तत्कालीन संचालक निवृत्त झाले. डॉ. वाकोडे सहसंचालक पदावर पोहोचले होते. ते देखील निवृत्त झाले. विद्यमान अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आहेत. मात्र, या प्रस्तावाला वैद्यकीय संचालक कार्यालयातूनच वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. यासंदर्भात अधिष्ठातांशी संपर्क साधला; परंतु होऊ शकला नाही. 

ऑटोक्‍लेव्ह परिचरदेखील अप्रशिक्षित - 
मेयोमध्ये असलेल्या शस्त्रक्रियागारांमध्ये (ऑपरेशन थिएटर)कपड्यांसहित सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष ऑटोक्‍लेव्ह परिचर असतात. मात्र, मेयो रुग्णालयात ही पदेदेखील कधीच निर्माण करण्यात आली नाही. सफाई कामगार तसेच अटेंडंट्‌सच्या भरवशावर ड्रेसर, बार्बर, परीट पदाचे काम सुरू आहे. इंटकचे नेते त्रिशरण सहारे यांनी ही पदे निर्माण करण्यासाठी निवेदन दिले असल्याची माहिती दिली. 

मेयोमध्ये ही पदे निर्माणच करण्यात आली नाही, तर  शासकीय वैद्यकीय महाविद्याल (मेडिकल)मध्ये ड्रेसर, बार्बरच्या मंजूर असलेली रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे अटेंडंट्‌स ही कामे करतात. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री आणि वैद्यकीय संचालक विदर्भाबाबत उदासीन आहेत. नागपूर भेटीत फक्त आश्‍वासने देऊन वेळ मारून नेली जाते. 
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, इंटक, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com