आईने बाळाला वॉकरमध्ये ठेवले अन्...झाला घात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

नागपूर : घरकाम करताना अनेकदा आईचे आपल्या बाळाकडे दुर्लक्ष होत असते. या दुर्लक्षामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते, असे कोणाच्याही ध्यानीमनी मसते. अशीच एक घटना नागपुरात रविवारी घडली. त्यामुळे बाळाची देखरेख करणार्या महिलांनी सदैव सजग असणे आवश्यक आहे.

आईचे दुर्लक्ष झाल्याने वॉकरमध्ये ठेवलेल्या बाळाचा तोल गेला. बाळ डोक्‍याच्या भारावर खाली पडले. मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने बाळ जागीच बेशुद्ध पडले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जाततरोडीत घडली. बाळाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

तोल जाऊन पडल्याने बाळाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंग ठाकरे (वय 32, जाततरोडी) येथे पत्नी व 17 महिन्यांचा मुलगा रणजितसोबत राहतात. 13 जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता बाळाला आईने वॉकरमध्ये ठेवले. काही वेळपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवल्यानंतर काही कामानिमित्त त्या किचनमध्ये गेल्या. दरम्यान, तोल गेल्याने मूल खाली पडले.

क्लिक करा - सुटे पैसे दिले नाही म्हणून चिडला पिंगर विक्रेता अन्‌ केले 'छपाक'

इमामवाड्यातील घटना
डोक्‍याच्या भारावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रडण्याचा आवाज ऐकताच आई घरातून धावतच बाहेर आली. तिने बाळाला उचलले. बाळ बेशुद्ध पडले होते. घाबरलेल्या आईने मदतीसाठी हाक मारली. शेजारी व कुटुंबीयांनी बाळाला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरला दाखल केले. पाच दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baby fallen from walker and died