दुचाकीच्या कर्जासाठी वाट्टेल ते...एक दोन नव्हे नऊ दुचाकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आरोपींनी शांतीनगरातील काही गरीब नागरिकांना बॅंकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांची कागदपत्रे जमा केले. यात आधारकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट फोटो, पॅनकार्ड, इलेक्‍ट्रिक बिल आणि बॅंकेचे पासबुक अशा कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांचा वापर करून गरिबांना कर्ज नव्हे तर स्वतःसाठी दुचाकी फायनान्स करीत होते. अशाप्रकारे आरोपींनी आतापर्यंत अनेकांच्या नावावर दुचाकीसाठी कर्जाची उचल केली तसेच दुचाकी खरेदीसुद्धा केल्या. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 9 दुचाकी जप्त केल्या.

नागपूर : अशिक्षित आणि गरीब नागरिकांना बॅंकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कागदपत्रे गोळा करीत त्या कागदपत्रांवर बॅंकेतून दुचाकीसाठी कर्ज उचलायचे, असा फंडा वापरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या ताब्यातून साडेपाच लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. अरबाज ऊर्फ मोनू सलीम शेख (23, मुदलीयार ले-आउट, शांतिनगर) आणि सैयद परवेज ऊर्फ मोनू सैयद नइम (31, मोठा ताजबाग) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शांतीनगरातील काही गरीब नागरिकांना बॅंकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांची कागदपत्रे जमा केले.

सविस्तर वाचा - डॉन आंबेकरचे पैसे प्रॉपर्टीत गुंतवणार कोण? वाचा काय झाले

यात आधारकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट फोटो, पॅनकार्ड, इलेक्‍ट्रिक बिल आणि बॅंकेचे पासबुक अशा कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांचा वापर करून गरिबांना कर्ज नव्हे तर स्वतःसाठी दुचाकी फायनान्स करीत होते. अशाप्रकारे आरोपींनी आतापर्यंत अनेकांच्या नावावर दुचाकीसाठी कर्जाची उचल केली तसेच दुचाकी खरेदीसुद्धा केल्या. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 9 दुचाकी जप्त केल्या.

बॅंक अधिकाऱ्यांमुळे पितळ उघडे
दोन्ही आरोपींनी बनावट कागदपत्रांवर कर्ज उचल केली. मात्र, ज्यांच्या कागदपत्रांचा वापर केला, त्याच्या घरी बॅंकेचे अधिकारी जायला लागले. अनेकांनी दुचाकीचे कर्ज न घेतल्याबाबत सांगितले. परंतु, अधिकाऱ्यांनी फोटो, कागदपत्रे आणि सह्या दाखवून कर्जाची परतफेड करण्याचा तगादा लावला. या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अनिल ताकसांडे यांना मिळाली. त्यांनी अभ्यासपूर्ण तपास करीत दोन्ही आरोपींना अटक केली.

पतीनंतर पत्नीलाही फसवले
भूजेंद्र वर्मा (लक्ष्मीनगर, कळमना) यांची कागदपत्रे आरोपींनी जमा केली. त्यांना कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली. आरोपींनी त्यांच्या कागदपत्रांवर दुचाकी फायनान्स केली. भूजेंद्र यांनी विचारणा केली असता पत्नीच्या नावावर कर्ज मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भूजेंद्र यांनी पत्नीची कागदपत्रे आरोपींना दिली. त्यावरही आरोपींनी दुसरी दुचाकी फायनान्स करीत दाम्पत्याला गंडविले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank loan fraud for two wheeler