
१५ आणि १६ मार्चला संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या यूएफबीयू यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
नागपूर : आज मार्च महिन्याची पहिली तारीख. या महिण्यात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांचे खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. १५ आणि १६ मार्च या दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. ११ तारखेला महाशिवरात्रीची सुटी आणि १२ तारखेला शुक्रवारी बॅंका सुरू राहतील. त्यानंतर १३ तारखेला शनिवार आणि १४ ला रविवार आहे.
हैदराबादमध्ये झालेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. बँकांचे खासगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयावर असंतोष व्यक्त करीत १५ आणि १६ मार्चला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ११ मार्चला महाशिवरात्रीची बॅंकेला सुटी आहे. १२ तारखेला एक दिवस बॅंकेतील व्यवहार होणार आहे. त्यानंतर १३ व १४ मार्चला शनिवार आणि रविवार असल्याने बॅंका बंद राहणार आहेत.
अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?
१५ आणि १६ मार्चला संप पुकारला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचा समावेश असलेल्या यूएफबीयू यांनी दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे जाहीर केले आहे. आयडीबीआय आणि एलआयसीमधील व्यवहारातून २०१९ पासूनच खासगीकरणाला सुरुवात झाली आहे.
सरकारचा विरोध
बँकांचे खासगीकरण करण्यासंदर्भात सरकारचा विरोध केला जात आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात बँक क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली.
- देवीदास तुळजापूरकर,
महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन