esakal | नागपूरकरांच्या मदतीला बारामतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

rohit.

युवा आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने सातशे लीटर सॅनेटायझर तयार करुन विविध जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे. त्यापैकीच 700 लीटर सॅनेटायझर नागपूरकारांसाठी मोफत पाठविण्यात येत आहे.

नागपूरकरांच्या मदतीला बारामतीचा हात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात रहाणे आणि खबरदारी पाळणे एकमेव उपाय आहे. मात्र कामासाठी घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग टाळाण्यासाठी सॅनिटायझर्  सर्वात उत्तम उपाय आहे. मात्र सध्या सर्वत्र सॅनिटायझरचा  काळा बाजार सुरू झाला आहे.मात्र असे असताना नागपूरकरांसाठी थेट बारामतीने मदतीचा हात दिला आहे. कर्जत-जामखेड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने सातशे लिटर सॅनेटायझर नागपूरकारांसाठी मोफत पाठवले आहे.
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मास्क आणि सॅनेटायझरचा वापर आवश्‍यक आहे. त्यामुळे बाजारात सॅनेटायझर आणि मास्कला मागणी वाढली आहे. या प्रकाराने बाजारात चढ्या दराने मास्क आणि सॅनेटायझरची विक्री केल्या जात आहे. बाजारात सॅनेटायझर मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे युवा आमदार रोहित पवार आणि बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने सातशे लीटर सॅनेटायझर तयार करुन विविध जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे. त्यापैकीच 700 लीटर सॅनेटायझर नागपूरकारांसाठी मोफत पाठविण्यात येत आहे. आज बुधवारी (ता.9) सायंकाळी बारामती येथून सॅनेटायझरचा ट्रक नागपूरात येताच राष्ट्रवादीचे युवा नेता आणि जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष शैलेंद्र तिवारी आणि शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण युवक अध्यक्ष श्‍याम मंडपे ,यांच्या चमूच्या मदतीने विविध शासकीय कार्यालयात सॅनिटायझर पोहोचविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - खाणीत पकडत होता मासे अचानक जाळ्यात अडकला पाय...मग

यामध्ये 200 लीटर सॅनेटायझर मेडिकलच्या ट्रामा सेंटरला, 100 लीटर मेयो रुग्णालयाला, 200 लीटर नागपूर महापालिकेला तर 200 लीटर नागपूर पोलिस विभागाला वितरीत करण्यात येणार आहे. याशिवाय सँनेटायझर  चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द ही करण्यात येणार आहे.