Video : बावनकुळे म्हणतात, वडेट्टीवारांचे भाजपमध्ये स्वागतच आहे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

नागपूर : विरोधीपक्षनेतेपदी राहिलेल्या विजय वडेट्टीवार यांना दुय्यम खाते देऊन कॉंग्रेसने त्यांच्यावर अन्यायच केला आहे. त्यामुळे त्यांचे नाराज होणे स्वाभाविकच आहे. आत पुढे काय करायचे हे त्यांनाच ठरवायचे आहे. भाजपात यायची इच्छा असल्याच त्यांचे स्वागतच केले जाईल, असे सांगून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना एकप्रकारे ऑफरच दिली.

विधानसभा निवडणुकीच्या आधी विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते होते. विधानसभेत विरोधीपक्षनेत्याला मोठा मान असतो. त्याची क्षमता, आक्रमकता, अनुभव लक्षात घेऊनच विरोधी पक्षनेता निवडला जातो. सहाजिकच सत्ता आल्यावर चांगले खाते त्यांना दिले जाईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र तुलनेत दुय्यम खाती त्यांना देण्यात आली. त्यामुळे वडेट्टीवार नाराज आहेत. त्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीलासुद्धा अनुपस्थिती होते असे कळते.

हेही वाचा - चढणार होती बोहल्यावर, मात्र नियतीच्या मनात होते काही वेगळेच
 
विदर्भावर कॉंग्रेसने अन्याय केला
वडेट्टीवार विदर्भाचे प्रमुख नेते आहेत. विदर्भाच्या विकासासाठी व भरीव काम करण्यासाठी त्यांना चांगले खाते देणे अपेक्षित होते. मात्र ते नाकारून चार वेळा निवडणूक आलेल्या नेत्यावर कॉंग्रेसने अन्याय केला आहे. नाराज असलेल्या वडेट्टीवारांनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनाच ठरवायचे आहे. भाजपात येण्याची इच्छा असल्याचे त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bawankule said vijay vadettivar most welcome