
जिल्ह्यातील सीमा बंद केल्याने दारू तस्करी बंदच झाली आहे. त्यामुळे मोहाच्या दारूची मागणी चांगलीच वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने किमतीतही प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरोनामुळे देश लॉक झाले आहे. नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाल्याने नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा दारुड्यांना होत असल्याचा दिसून येतो. दारू मिळत नसल्याने रोज दारू पिणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे तळीरामांनी तहानलेल्या मनाला शांत करण्यासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. "तू सांग किती पैसे पाहिजे, मला मोहाची दारू दे अन् इच्छा पूर्ण कर' असे तळीराम म्हणताना दिसून येत आहेत. दारूचा एकही घोट मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मोहाच्या दारूकडे वळलेला आहे. कवडीमोल भावामध्ये विकली जाणारी मोहाची दारू आता देशी दारू पेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.
सन 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात सरकारने दारूबंदी घोषित केली. तेव्हापासून येथील दारुड्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. परंतु, जिल्ह्याला लागून असलेले यवतमाळ, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांतून तसेच तेलंगानामधून दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येत होती. यामुळे दारुड्यांचे शौक पूर्ण होत होते. सत्तापरिवर्तन होताच मधल्या काळात चंद्रपुरातील दारूबंदी उठवायची की नाही याचा विषय चांगलाच गाजला होता. यावर अनेकांनी आपापले मत व्यक्त केले होते.
जाणून घ्या - Video : साहेबऽऽ, लोक पैसे देतात अन् पूर्ण शरीराशी खेळतात, आज मात्र...
मात्र, आता कोरोनाच्या रूपात चांगलीच बंदी आली आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सीमा बंद केल्याने दारू तस्करी बंदच झाली आहे. त्यामुळे मोहाच्या दारूची मागणी चांगलीच वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने किमतीतही प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरपना जिवती तालुक्यातील अनेक डोंगराळ भागात मोह फुलांची दारू काढून विकण्याचा व्यवसाय पूर्वीपासूनच होत आहे. त्यातच भर पडली लॉकडाउनची. यामुळे व्यवसायाला पंखच फुटले. मोहाचा दारूच्या वाढत्या मागणीने दहा रुपयाला ग्लास भर मिळणारी दारू 150 ते 200 रुपयाला एक पव्वा विकला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजुरा या तालुक्यातील अनेक गावे डोंगराळ भगत वसलेली आहेत. येथे मोह फुलांची झाडे भरपूर प्रमाणात असल्यामुळे दारू काढून तस्करी करण्याला उत आला आहे. नानकपठार, लेंडीगुंडा, कल्लीगुडा बैलमपूर, बॉम्बेझरी या गावांमधून रोज मोहाच्या दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.
असे का घडले? - प्रेयसी दुसऱ्यासोबत सेट झाल्याने टिकटॉकवर टाकले दर्दभरे व्हिडिओ अन्
जिल्ह्यात दारूबंदी असताना लपून दारू पिणारा तळीराम दारूचा प्याला मिळविण्याच्या शोधता असतो. त्यामुळे मोहाच्या दारूची तस्करी शहरामध्ये दुप्पट ते तिप्पट भावात करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे तर यात आणखीनच भर पडली आहे.