वाघिणीच्या हल्ल्यात बेसूरचे दोघे जखमी...बछड्यांसह दबा धरून बसली होती शेतात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शेतात काम करणारा मजूर कमलाकर नारनवरे व शेतमालक प्रभुजी गंधरे हे शनिवारी (ता. 23) सकाळी शेतात गेले होते. त्यावेळी वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या दोघांनी आरडाओरड केल्याने वाघिणीने शेतात पळ काढला. त्यामुळे या दोघांचा जीव वाचला.

भिवापूर (जि. नागपूर) : वाघिणीच्या हल्ल्यात शेतमालकासह दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना भिवापूर तालुक्‍यातील बेसूरजवळ असलेल्या केसलापार शिवारात शनिवारी (ता. 23) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान घडली. मात्र आरडाओरड करताच वाघिणीने शेतात पळ काढल्याने या दोघांचा जीव वाचला. परंतु शेतमालकांवर हल्ला करणारा वाघ नसून वाघीण असल्याची माहिती मिळाली आहे.

बेसूर येथील प्रभुजी गंधरे यांची शेती केसलापार शिवारातील जंगलाजवळ लागून आहे. त्यांनी शेतात उसाची लागवड केली आहे. उसाच्या शेतात वाघीण आपल्या बछड्यांसह दबा धरून बसली होती. या उसाच्या शेतातच वाघिणीने बछड्यांना जन्म दिला असावा, असे समजते. त्यामुळे शेतात काम करणारा मजूर कमलाकर नारनवरे व शेतमालक प्रभुजी गंधरे हे शनिवारी (ता. 23) सकाळी शेतात गेले होते.

फोनवरून दिली गावकऱ्यांना माहिती

त्यावेळी वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या दोघांनी आरडाओरड केल्याने वाघिणीने शेतात पळ काढला. सकाळची वेळ असल्याने कोणीही शेतकरी शेतात नव्हता. त्यामुळे त्यांनी गावात संबंधितांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी शेतात धावून आले. ज्या ठिकाणी वाघिणीने हल्ला केला, तेथे गावकरी कमलाकर नारनवरे यांना घेऊन गेले.

गावकऱ्यांच्या आरडाओरडीने वाघीण पळाली जंगलात

मात्र वाघिणी पुन्हा नारनवरेवर हल्ला चढवला. त्याच्या सोबत असलेले बेसूर येथील डॉ. कपूर यांनी काठीने तर गावकऱ्यांनी हल्ला केल्याने वाघीण अखेर जंगलात पळून गेली. त्यामुळे प्रभुजी गंधरे व कमलाकर नारनवरे थोडक्‍यात बचावले. गंधरे व नारनवरे यांच्या हाताला, खांद्याला, पाठीला वाघाच्या दातांच्या व नखाच्या जखमा झालेल्या आहेत. तसेच वाघिणीने हल्ला केल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना घटनास्थळाचा पंचनामा केला.

जाणून घ्या : आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही

जखमींना रुग्णालयात हलविले

जखमींना उमरेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त बाग शल्याने येथे नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकट्या दुकट्याने शेतात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Besur's two were injured in tiger attack