esakal | आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही
sakal

बोलून बातमी शोधा

tourism.

राज्यातील वनांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांचे संवर्धन करणे तसेच वनांवर आधारीत उद्योगांना चालना देणारे पुढील 10 वर्षांचे धोरण तयार करणे. त्यातून वनविभाग व पर्यटनस्थळांचा विकास, निसर्गाचे रक्षण व सुसंगत असे निसर्ग पर्यटन आदी बाबींचा यात समावेश राहणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देणारे व या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणारे नविन निसर्ग पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे.
लवकरच निसर्ग पर्यटन  धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
नविन निसर्ग पर्यटन धोरणासंदर्भात वनभवन येथे वनमंत्री संजय राठोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. वन पर्यटनाला चालना देणे, वनालगतच्या गावातील जनतेला रोजगार मिळवून देणे आणि राज्यातील वनांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांचे संवर्धन करणे तसेच वनांवर आधारीत उद्योगांना चालना देणारे पुढील 10 वर्षांचे धोरण तयार करणे. त्यातून वनविभाग व पर्यटनस्थळांचा विकास, निसर्गाचे रक्षण व सुसंगत असे निसर्ग पर्यटन आदी बाबींचा यात समावेश राहणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ
विदर्भाला मोठ्या प्रमाणावर वनसंपदा लाभली असून, तिचे संवर्धन करणे आणि स्थानिकांना त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. अशा प्रकारचे धोरण केंद्र शासनाने 2018 मध्ये आस्तिवात आणले आहे. केंद्र शासनाच्या या धोरणाच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ अभ्यास करणार  असून तसा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमेार सादर केला जाणार आहे.