घरातच उघडला जुगार अड्डा, पोलिसांच्या धाडीत 17 आरोपींना अटक

Crime
Crime

नागपूर : वकीलपेठमधील हजारेवाडी येथे सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर शहर गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने धाड घालून 17 आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 2 लाख 31 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गुलाबराव बागडे (47) याने आपल्याच घरी हा जुगाराचा अड्डा भरविला होता. रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात जुगारी जुगार खेळण्यासाठी या अड्ड्यावर आले होते. युनिट 4 च्या पथकाला याबाबत कळताच रविवारी सायंकाळी 6.45च्या सुमारास या अड्ड्यावर धाड टाकली. धाड पडताच जुगाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आधीपासूनच पोलिसांनी नाकाबंदी केल्याने कुणालाही पळून जाता आले नाही.

सविस्तर वाचा - पोलिस अधिकाऱ्यांची चलाखी, आवडीच्या ठिकाणी होतात उशिरा रुजू
पोलिसांनी या अड्ड्यावरून रामराव उमराव राऊत (40) सुदामनगरी, उमरेड रोड, सूरज नत्थुजी घोडके (35) वकीलपेठ, अभिषेक प्रेमलाल आसोले (19) तांडापेठ, सचिन छत्रपती मेश्राम (24) वकीलपेठ, चंद्रकांत ऊर्फ चंदू लालाजी शिवरकर (42) जुनी मंगळवारी, अर्जुन नंदकिशोर राणा (22) मानवशक्ती ले-आउट बहादुरा, श्‍याम फकिरा वाडधरे (48) जुनी मंगळवारी, मंगल रमेश श्रीवास्तव (22) खरबी, नवनाथनगर, अतुल शरद फुंडे (27) महादुर्गानगर, पीयूष ऊर्फ गोलू रघुराजसिंग (24) हजारेवाडी, पवन नत्थुजी घोडके (37) वकीलपेठ, भूपन ठाकूर टिकसे (31) चंद्रभागानगर तांडापेठ, संतोष पुत्तन सैनी (50) त्रिमूर्तीनगर, आतिश दिलीप घोडके (28) वकीलपेठ, रौनक राजेश चवरे (18) सिरसपेठ, तरबेज खान समशुद्दीन खान (26) रोशनबाग, खरबी आणि संजय ईश्‍वर सातपुते (32) लालगंज यांना अटक केली.
महागडे मोबाईल आणि रोख जप्त
आरोपींच्या ताब्यातून रोख 50 हजार 200 रुपये, 15 महागडे मोबाईल आणि तासपत्ते असा 2 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली. पोलिस अड्डाचालक विजय बागडे याचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक किरण चौगले, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, अजय रोडे, नितीन आकोटे, आशीष क्षीरसागर, सचिन तुमसरे, अविनाश ठाकूर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com