
नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत होऊनही या कायद्याला विरोध कायमच आहे. देशभरात या कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
नागपूर : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि संभाव्य नागरिक नोंदणी (एनआरसी)ला न समजता विरोध केला जात आहे. अगोदर सरकारने हा कायदा का आणला, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. मात्र, कळत नाही देशातील वातावरण का खराब केले जात आहे. याला विरोध करणे चुकीचे आहे. आम्ही आवाहन करतो की हा कायदा समजून घ्या. या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतले आहे. या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नाही तसेच झाला नाही, असे भय्याजी जोशी म्हणाले.
प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल येथील संघ मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोरण करण्यात आले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत होऊनही या कायद्याला विरोध कायमच आहे. देशभरात या कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. एनआरसी, सीएए आणि एनपीए या कायद्यांना विरोध करण्यसाठी वंचित बहुजन आघाडीने हा बंद पुकारला होता. याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
असे का घडले? - विदेशी तरुणाशी फेसबुकवर फुलले प्रेम आणि बदल्यात मिळाले हे...
मात्र, केंद्र सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम असून, कायद्यात बदल करण्यास तयार नाही. तसे सुचोवातही पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अगोदरच दिले आहे. तरीही सीएएला होणार विरोध कायमच आहे. सीएए, एनआरसीमुळे देशाचे नाक कापले जाईल आणि तसे होऊ नये म्हणून आम्ही हा बंद पुकारला आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. अनेकांचा विरोध कायमच आहे.
देशात भाजपची सत्ता आहे. काही राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भाजपला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधांकडून सुरू आहे. सीएए व एनआरसीला धरून नागरिकांमध्ये भ्रम निर्माण केले जात आहे. मुस्लिमांना या देशात जागा मिळणार नाही, अशी भीती दाखवली जात आहे. मात्र, असे काहीही नाही. सरकारने हा कायदा का आणला, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. याला विरोध करणे चुकीचे आहे. देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नाही, असेही भय्याजी जोशी म्हणाले.