भीमजयंतीला मिरवणुका नको, घरीच संविधान वाचा, धम्मगुरू भदन्त सुरेई ससाई यांचे आवाहन

Bhima Jayanti does not want to die, read constitution at home, appeals to Dhammaguru Bhadant Surey Sasai
Bhima Jayanti does not want to die, read constitution at home, appeals to Dhammaguru Bhadant Surey Sasai
Updated on

नागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक आहे. त्यामुळे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढू नका. घरीच बसून संविधानाचे वाचन करा, असे आवाहन धम्मगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 13 एप्रिल रोजी मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. मध्यरात्री 12च्या ठोक्‍याला उपराजधानीतून निघणाऱ्या सर्व मिरवणुका संविधान चौकात येतात. हजारोंच्या संख्येने अनुयायी मिरवणुकीत सहभागी होतात. जयंतीदिनीही दिवसभर संविधान चौक, दीक्षाभूमी फुललेली असते. यंदा अवघ्या जगावर कोरोना संसर्गाचे संकट आहे. सुरक्षित सामाजिक अंतर ठेवूनच कोरोनाला मूठमाती द्यायची आहे. उत्सवानिमित्त जमावामुळे अखंड समाजाची प्रतिमा मलिन होऊ नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे. शहरातील बुद्धविहार कमिट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जयंतीच्या पर्वावर मिरवणुका निघणार नाही, यासंबंधीची खबरदारी घ्यावी. समूहाने जयंती साजरी करू नये. घराबाहेर पडू नये, असे आवाहन धम्मगुरू ससाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com