सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

राजेश रामपूरकर
Sunday, 27 September 2020

गेले आठ दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोन्याबरोबरच चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. करोना संकट आणि बाजारातील मागणी कमी झाल्याने सोने आणि चांदीचे सौदे गडगडले असल्याचे जाणकार सांगतात.

नागपूर : युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या भीतीने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. यामुळे त्यांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी, कमॉडिटी बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्या आहेत.  गेल्या आठवड्याच्या शेवटी चांदीचा भाव प्रतिकिलो ६५ हजार ५०० रुपये होता. सोन्याच्या तुलनेत चांदीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. या आठवड्यात चांदीमध्ये ५ हजार ५०० रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या दरातही फक्त ३०० रुपयांची घट झाली.

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये नफा-वसुली जोरात सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या भावाने ५० हजारांची पातळी तोडली आहे. सोने सध्या ५० हजार ५०० रुपयांवर आल्याने खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आता संधी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

गेले आठ दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सोन्याबरोबरच चांदीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. करोना संकट आणि बाजारातील मागणी कमी झाल्याने सोने आणि चांदीचे सौदे गडगडले असल्याचे जाणकार सांगतात. एक किलो चांदीचा दर ६० हजार रुपये झाला आहे. कॉमेडिटी बाजार आणि प्रत्यक्ष बाजारात भावात फार तफावत असते. 

बाजारात तेजी नाही

त्याचे कारण सोन्यावर ३ टक्के वस्तू आणि सेवा कर तसेच घडणावळ मजुरी आकारणे आहे. भारतात सध्या अधिक महिना सुरू असला तरी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्यापही ग्राहकांनी खरेदीसाठी बाहेर पडणे सुरू केलेले नाही. सराफा व्यापाऱ्यांनी अद्यापही बाजारात अस्थिरता असल्याने सोन्याची खरेदी केलेली नाही. ग्राहकांची सोन्याला मागणी नसल्याने सध्या दरही घटलेले आहे. ही ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. मात्र, ग्राहक अजून दर कमी होतील या भ्रमात असतील तर त्यांचे अंदाज चुकणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

खरेदी करण्यासाठी हाच उत्तम कालावधी 
अधिक महिना संपल्यानंतर सराफा व्यापाऱ्यांकडून सोन्याची खरेदी सुरू होईल. त्यामुळे देशात एकाचवेळी सोने खरेदी वाढेल आणि दरही चढ्या आलेखानुसार वाढतील. कोरोनाचे सावट, अधिक महिना यामुळे अद्यापही बाजारात ग्राहकी वाढलेली नाही. त्यामुळेच सोने गेल्या २० दिवसांपासून किंचित चढ-उतारावर स्थिरावले आहे. ५८ हजार रुपये दहा ग्रॅमवर गेलेले सोने ५१ हजारांच्या आतच स्थिरावले आहेत. सोने- चांदीचे भाव नवरात्रीनंतर वाढतील, त्यामुळे आता सोने-चांदी खरेदी करण्यासाठी उत्तम कालावधी आहे.
राजेश रोकडे,  रोकडे ज्वेलर्सचे संचालक  

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A big drop in gold-silver prices