ब्रेकिंग: नागपूरमधील पाचगावच्या मेहता ॲग्रो इंडस्ट्रीजला भीषण आग; सुदैवानं जीवितहानी टळली 

अनिल पवार  
Thursday, 3 December 2020

या भागात राहणाऱ्या नागरिकांनी मेहता कंपनीच्या दिशेने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. नागपूर ते उमरेड महामार्गावरून पाचगाव सबस्टेशन नजीकच्या मेहता कंपनीला आग लागल्याचे दृश्य दिसत होते.

चांपा (जि. नागपूर) : उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील ३२ केव्हीच्या सबस्टेशनच्या परिसरात आनंद मेहता एग्रो इंडस्ट्रीज प्रा ली कंपनीला गुरूवारी दुपारी अडीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सबस्टेशन नजीकच्या परिसरातील आनंद मेहता फॅट्स अँड फूड कंपनीला आग लागताच पाचगाव परिसरात सर्वत्र धावपळ उडाली.
 
या भागात राहणाऱ्या नागरिकांनी मेहता कंपनीच्या दिशेने धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. नागपूर ते उमरेड महामार्गावरून पाचगाव सबस्टेशन नजीकच्या मेहता कंपनीला आग लागल्याचे दृश्य दिसत होते.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

नागरिकांचा वाढता लोंढा व कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता कुही पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाबराव परघणे, उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार जोगदंड ,पाचगावच्या सरपंच सौ, उषाताई ठाकरे , पाचगावचे तलाठी ज्ञानेश्वर नागरे, पाचगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक भरत खेटे, घटनास्थळी दाखल झाले.

पाचगाव सबस्टेशन नजीकच्या परिसरात असलेल्या मेहता कंपनी ला शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येताच मोठी त्यांनी जीवितहानी होऊ नये या दृष्टीने सतर्कता बाळगली. मेहता कंपनीला आग लागल्याचे दिसताच काही कर्मचारी घटनास्थळी पाणी घेऊन पोहचले. सबस्टेशनच्या मागील परिसरात मेहता कंपनीला आग लागल्याने मेहता कंपनीचे पंधराशे टन माल जळून खाक झाले ,काही कर्मचारी कंपनी सोडून पसार झाले,तर काहींनी आपला जीव धोक्यात घालून आग विजविण्यास धावून आले. 

हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अम्निशामक दलाचे तीन गाड्या घटनास्थळी पोहोचले. अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. आग आटोक्यात येईपर्यंत मेहता कंपनीच्या भागात सर्वत्र काळोख पसरला होता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Fire in Mehta agro industries in Nagpur