हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

संतोष ताकपिरे
Monday, 30 November 2020

तक्रारीनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू केला. मात्र, बाळाचा काही पत्ता लागत नव्हता. अठरा तासांनंतर त्याच घरातील विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला. नवजातच मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठविला. राजापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली आहे.

अमरावती : शहरातील न्यू प्रभात कॉलनीत भरदुपारी घरातून एका सव्वा महिन्याचा नवजात बालक बेपत्ता झाला होता. सोमवारी (ता. ३०) अठरा तासांनंतर घराच्या आवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने पोलिसांनाही बुचकळ्यात पाडले. घटनेच्या वीस तासांनंतरही तपास यंत्रणेसमोर पेच कायम आहे.

रविवारी (ता. ३०) घरात बाळाची आई बाथरुममध्ये गेली होती. महिलेचा भाऊ हॉलमध्ये टीव्ही बघत होता. तीस सेकंदात महिला बाथरुमधून खोलीत परत येते आणि नवजात बालक बेपत्ता झाल्याचे बघून हंबरडा फोडले. गल्लीपासून आसपासच्या नाल्याही बघितले जाते. मात्र, बाळ सापडत नाही. त्यामुळे कुटुंबीय पोलिसांकडे तक्रार दाखल करते.

जाणून घ्या - नागपुरात दिवसा थरार : वाहतूक पोलिस कर्मचारी बोनेटवर आणि कार सुसाट

तक्रारीनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू केला. मात्र, बाळाचा काही पत्ता लागत नव्हता. अठरा तासांनंतर त्याच घरातील विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला. नवजातच मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठविला. राजापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली आहे. सव्वा महिन्याच्या नवजात बालकाचा मृतदेह विहिरीत आढळला त्याचा अद्याप नामकरण सोहळा देखील झाला नव्हता, असे कुटुंबीयांनी सांगितले.

कुटुंबातील तिघे जण पोलिस

महिलेचे वडील, काका व जावई पोलिस कर्मचारी आहेत. त्या कुटुंबात ही घटना घडली. त्या कुटुंबात जवळचे तिघे पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनीही घटना कशी घडली. घटनेच्या वेळी घरात असलेली बाळाची आई आणि तिचा भाऊ या दोघांकडेच चौकशी केली.

मोलकरीणीची चौकशी

घटनेच्या काही तासांपूर्वी घरकाम करणारी मोलकरीण किरकोळ कामासाठी येऊन गेली होती. घटनेनंतर पोलिसांची तिचीही चौकशी केली. परंतु, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.

हेही वाचा - महिलेचा पंटरशी संवाद; ‘अजून प्रसूती झालेली नाही, तुम्हाला बाळ देऊ शकत नाही’

जादूटोणा करणारेही होते रडारवर

रविवारी (ता. २९) पोर्णिमा असल्यामुळे घटनेनंतर पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्यांच्या ठिकाणी सुद्धा झाडाझडती घेतली. जेथे यापूर्वी अशा घटना घडल्या त्याठिकाणीही भेटी दिली. परंतु, त्यातूनही तपास पुढे सरकला नाही. 

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a missing newborn baby was found in a well

Tags
टॉपिकस
Topic Tags: