महाविकास आघाडी हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार - मुनगंटीवार

नीलेश डोये
Saturday, 28 November 2020

शिवसेनेने निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात घरगुती वीज बिलात 30 टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते पाळले गेले नाही. उलट कोरोनाच्या संकटात विजेचे दर वाढवले. या सरकारने लोकांचा विश्वासघात केला, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर : राज्यातील तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे हे सरकार म्हणजे राजकीय अल्झायमर झालेले सरकार आहे. तर्कशून्य निर्णय घेणारे हे सरकार म्हणजे अजब सरकारची गजब कहाणी आहे. शिवसेनेने निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात घरगुती वीज बिलात 30 टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते पाळले गेले नाही. उलट कोरोनाच्या संकटात विजेचे दर वाढवले. या सरकारने लोकांचा विश्वासघात केला, असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत...

विदर्भ विकास मंडळाची मुदत संपली. पण अजून कार्यकाळ वाढीचा निर्णय नाही. लोकांचे काम करण्याऐवजी हे सरकार सूड उगवत आहे. हे सरकार रडणारे सरकार आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय सुद्धा ठेवला नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

हेही वाचा - ५५ हजार हेक्टरवरील तुरीचे पीक संकटात, ढगाळ...

केंद्राकडून आतापर्यंत राज्याला 68,209 कोटी -
राज्य सरकार नेहमी जीएसटीचे रडगाणे गात असते. कोरोनाच्या संकट काळात केंद्राने आतापर्यंत 68,209 कोटी रुपये दिले. राज्यातील सरकार पाडणे हा आमचा अजेंडा नाही, ते टिकावे यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. हे सरकार स्वतःहूनच पडेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader sudhir mungantiwar criticized mahavikas aghadi government in nagpur