"ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

तब्बल 20 दिवस ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील सुश्रृषा केल्यानंतर त्याचा पायात बळ आले. नवीन पाहूणचार उडू लागला होता. सरावासाठी मोठ्या पिंजऱ्यात ठेवले. आता पायातील रॉड काढल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा विचार सुरू असतानाच त्यांनी स्वतःहून जाळीच्या छिद्रातून आकाशाकडे भरारी घेतली.

नागपूर : सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करून तंदुरुस्त केलेला दुर्मीळ पक्षी "ब्लॅक बिटन'ने तब्बल 20 दिवसांची सुश्रूषा आणि पाहुणचारानंतर स्वतःहून आकाशात भरारी घेतली आहे. आकाशात भरारी घेताना त्याच्या पायातील रॉडचा भार घेऊन त्याने अचानक अधिवासात मुक्तसंचारास सुरुवात केली आहे. 

खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये विजेचा धक्का लागल्याने मृतपाय अवस्थेत असलेला हा पक्षी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आला होता. तो आययुसीएनच्या लाल यादीतील दुर्मिळ पक्षी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर डॉ सय्यद बिलाल व सिद्धार्थ मोरे यांनी प्रथमोपचार केले. दरम्यान, पाय तुटल्याचे लक्षात आल्याने एक्‍स- रे काढला आणि पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवस अतिदक्षता कक्षात ठेवल्यानंतर बाहेर काढले.

तब्बल 20 दिवस ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमधील सुश्रृषा केल्यानंतर त्याचा पायात बळ आले. नवीन पाहूणचार उडू लागला होता. सरावासाठी मोठ्या पिंजऱ्यात ठेवले. आता पायातील रॉड काढल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्याचा विचार सुरू असतानाच त्यांनी स्वतःहून जाळीच्या छिद्रातून आकाशाकडे भरारी घेतली.

गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

पक्ष्याच्या पायात रॉड आणि पिन आहे. डॉक्‍टरांच्या मते रॉड असला तरी त्याला त्याची अडताना अडचण होणार नाही. तो सहजरीत्या निसर्गाच्या सानिध्यात अधिवासात जीवन जगेल असा आशावाद व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black britan bird fly away with rod