
कामठी : मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाचा कन्हान नदीत मृतदेह आढळल्याची घटना स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत युवकचे नाव मुकेश गुलाबराव रामटेके (वय ३७, भीमनगर, गवळीपुरा कामठी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भीमनगर, गवळीपुरा येथील राहिवासी ३७ वर्षीय मुकेश गुलाबराव रामटेके या युवकाला पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातात दोन्ही हात कटल्याने अपंगत्व आले होते. नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे होऊन तो नुकतेच कामठी येथे घरी आले असता सोमवारी पहाटे चार वाजता ‘मॉर्निंग वॉक’ला जातो, असे सांगून तो घराबाहेर फिरायला निघाला.
मात्र, बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने घरची मंडळी चिंतित होती. रती मुकेश रामटेके यांनी स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिसिंगची नोंद करण्यात आली. बुधवारी दुपारी तरुणाचा मृतदेह कन्हान नदीत आढळला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊत कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. विवाहित तरुणाच्या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. त्याने अपंगत्वाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असाही अंदाज लावण्यात येत आहे. मृताच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.
ब्राह्मणी येथील नीलेश चंद्रशेखर मोमते (वय ३७, गोतमारे ले-आऊट वॉर्ड चार ब्राह्मणी) या युवकाने बुधवारी (ता.१६) रात्री घरातील रूममधील छताला असलेल्या सिलिंग फॅनला अडकवून गळफास घेतल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने येथील पोतदार नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या युवकांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.