झोपड्याजवळून येत होती दुर्गंधी; पोते उघडले असता आढळला युवतीचा मृतदेह, बलात्कार करून खून केल्याचा संशय

अनिल कांबळे
Tuesday, 17 November 2020

युवतीचा एक हात धडापासून वेगळा केलेला होता. तो हातही मृतदेहाजवळ आढळून आला नाही. वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी मेडिकलमध्ये रवाना केला. युवतीवर एक किंवा त्यापेक्षा जास्त युवकांनी बलात्कार केला असावा.

नागपूर : जयताळा बाजार चौकातील एका पडक्या झोपड्यात युवतीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. युवतीच्या मृतदेहाला पोत्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते. युवतीवर बलात्कार केल्यानंतर खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा बाजार चौकात एका झोपड्याजवळ पोत्यातून दुर्गंध येत होता. मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही युवकांनी पोलिस नियंत्रण कक्षात माहिती दिली. यानंतर सोनेगाव पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी पोत्याला उघडले असता युवतीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला.

सविस्तर वाचा - चारित्र्यावर संशय घेतल्याने प्रेयसीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करुण अंत, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीचा एक हात धडापासून वेगळा केलेला होता. तो हातही मृतदेहाजवळ आढळून आला नाही. वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी मेडिकलमध्ये रवाना केला. युवतीवर एक किंवा त्यापेक्षा जास्त युवकांनी बलात्कार केला असावा.

त्यानंतर तिचा हात कापण्यात आला असावा. युवतीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हत्याकांडातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. हत्येचे खरे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.

सीसीटीव्ही फुटेजवरून शोध सुरू

मृतदेहाची स्थिती पाहता गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच युवतीचा खून झाल्याचा अंदाज आहे. जयताळा चौकाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिस तपासत आहेत. फुटेजवरून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा - "भूषण शहिद झाला आता दुसऱ्या मुलालाही सैन्यात पाठवणार"; दुःखात बुडालेल्या देशभक्त मातेचे उद्गार

मिसिंगची तक्रारींची पडताळणी

गेल्या आठवड्याभरात शहरातून मिसिंग झालेल्या मुली आणि त्यांच्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची पडताळणी पोलिस करीत आहेत. विशेष करून एमआयडीसी, प्रतापनगर, सोनेगाव या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिसिंग तक्रारींचा आढावा पोलिस घेत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a young woman was found in Nagpur