रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boost the immune system with a sattvic diet

शाकाहारातूनच आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे मिळतात. आपल्या शरीराला ५० टक्के प्रथिनांची गरज असते. कोरोनाविरुद्ध व्हिटॅमिन सी आणि डी महत्त्वाचे आहे. ते लिंबू, मोसंबी, आवळा या फळांतून मिळते, त्यामुळे या फळांचा रोजच्या आहारात भरपूर समावेश करा, असेही डॉ. पेंढारकर यांनी सांगितले.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला

नागपूर : प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्ध लढताना उत्तम रोगप्रतिकारशक्ती हाच मंत्र आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कुठलीही औषधे विकत घेण्याची गरज नाही. दररोजचा सात्त्विक आहार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पुरेसा आहे. प्रत्येकाने त्यावर भर द्यावा, असे आवाहन आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांनी केले.

महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी त्या बोलत होत्या. आहार संतुलित, सकस आणि सात्त्विक असणे आवश्यक आहे. यासाठी मांसाहार करण्याचीही गरज नाही.

सविस्तर वाचा - खर्राच ठरतोय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे कारण; तपासणीत उशीर केल्याने भीतीचे वातावरण 

शाकाहारातूनच आवश्यक ती सर्व पोषक तत्त्वे मिळतात. आपल्या शरीराला ५० टक्के प्रथिनांची गरज असते. कोरोनाविरुद्ध व्हिटॅमिन सी आणि डी महत्त्वाचे आहे. ते लिंबू, मोसंबी, आवळा या फळांतून मिळते, त्यामुळे या फळांचा रोजच्या आहारात भरपूर समावेश करा, असेही डॉ. पेंढारकर यांनी सांगितले.

शरीराला साखरेची गरज नाही. त्यामुळे ती शक्यतो टाळाच. शरीरात ग्लुकोज तयार होत असल्याने वेगळी साखर घेणे हे धोकादायकच आहे. याशिवाय तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळा. तळलेल्या पदार्थात ‘ट्रान्स फॅटी ॲसिड’ तयार होतो, जे रोगाचे मुख्य कारण आहे. रिफाइन्ड तेल खाणे हे सुद्धा धोक्याचे आहे. तेलबियांपासून तयार होणारे घाणीचे तेलाचाच आहारात समावेश करा, असेही त्या म्हणाल्या.

जाणून घ्या - मुंबई-पुण्याला जायचं, नो टेन्शन!, उद्यापासून ही लांब पल्ल्याची  सेवा होणार सुरू

जंक फूड खाणे बंदच करा

गायीचे तूप, डाळ, शेंगदाणे, फुटाणे हे सर्व रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कॅल्शिअम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दूध, दही, ताक यामधून कॅल्शिअम मिळते. त्यामुळे त्याचे भरपूर सेवन करा. बाहेरचे जंक फूड खाणे बंदच करा, असा सल्ला डॉ. पेंढारकर यांनी दिला.

संपादन - नीलेश डाखोरे

Web Title: Boost Immune System Sattvic Diet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top