esakal | अजब प्रेम की गजब कहानी! फेसबुक प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं केलं धकाकदायक कृत्य 
sakal

बोलून बातमी शोधा

Boy in 10th standard went to Aurangabad from Nagpur to meet his gf

ही घटना रविवारी सकाळी घडली. १५ वर्षीय मुलगा दहाव्या वर्गात शिकत असून, चे वडील शासकीय नोकरी करतात.

अजब प्रेम की गजब कहानी! फेसबुक प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला भेटण्यासाठी त्यानं केलं धकाकदायक कृत्य 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः दहावीत शिकणाऱ्या मुलाचे औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीशी फेसबुकवरून मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही पहिल्या भेटीसाठी आतुरता लागली. प्रेयसीला भेटीसाठी मुलाने वडिलांच्या खिशातून पैसे चोरून दुचाकीने औरंगाबाद गाठले. 

ही घटना रविवारी सकाळी घडली. १५ वर्षीय मुलगा दहाव्या वर्गात शिकत असून, चे वडील शासकीय नोकरी करतात. मुलाचे औरंगाबादेतील एका मुलीसोबत फेसबूकवरून सूत जुळले. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही फोनवरून सतत संपर्कात राहत होते. दोघेही भेटीसाठी आतुर झाले. प्रेयसीने त्याला औरंगाबादला येण्यास सांगितले. 

हेही वाचा - सुखी संसाराचा करूण अंत; मैत्रिणीच्या लग्नास जाण्यास पतीनं केला विरोध अन् नवविवाहितेनं...

दोघांची भेट ठरली. त्यामुळे रविवारी सकाळी मुलाने वडिलांच्या खिशातील २९०० रुपये काढले व मोटरसायकल घेतली आणि थेट औरंगाबादकडे कूच केली. दुपार झाल्यानंतरही तो घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. तो आढळून आला नाही. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ येत होता. त्यामुळे नातेवाइकांना काळजी वाटली. मित्रांकडे चौकशी केली. परंतु त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी मानकापूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा - Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

फेसबूकमुळे सापडला धागा

घरातून पैसे आणि बाईक घेऊन निघून गेलेल्या मुलाचे अपहरण झाल्याचा संशय आला. परंतु पोलिसांनी त्याचे फेसबुक आणि मोबाईलचा कॉलडाटा काढला. त्यावरून त्याचे प्रेमप्रकरण उघडकीस आले. तो औरंगाबादकडे निघाल्याचे पोलिसांना कळले. त्याच्या शोधासाठी मानकापूर पोलिसांचे पथक लवकरच औरंगाबादला जाण्याची शक्यता आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ