गर्लफ्रेंड को करना था इम्प्रेस... तो देता था पुलीस को स्ट्रेस

boy steal a racing bike to make an impression on a girlfriend
boy steal a racing bike to make an impression on a girlfriend

नागपूर : गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी कोण काय शक्‍कल लढवेल, याचा नेम नाही. एक प्रेमवीर गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्‍क चोर बनला. तिचे प्रेम मिळविण्यासाठी यु-टूबवरून चोरीचे प्रशिक्षण घेऊन साधी-सुधी नव्हे तर थेट "रेसिंग बाईक' चोरायला लागला. अशाच एका प्रेमवीर चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक नव्हे दोन नव्हे तर चक्‍क तीन महागड्या रेसिंग बाईक पोलिसांनी जप्त केल्या. चोरी करण्यामागील कारण ऐकूण पोलिसही चक्रावून गेले तर सुटल्यानंतरही प्रेयसीसाठी "काही पण' असे सांगत प्रेमवीर पोलिसांच्या वाहनात बसला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र भीमराव डोंगरे (22, रा. शिरपूर, पो. धामणा, जि. नागपूर) याने सहा डिसेंबर 2019 ला (एमएच 31/ बीपी 24871) क्रमांकाची दीड लाखांची केटीएम दुचाकी दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून चोरी गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी 16 डिसेंबर 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 17 फेब्रुवारीला दाभा परिसरात गस्त घालणाऱ्या गिट्टीखदान पोलिसांना एक युवक संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला. 

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याचे नाव व पत्ता विचारला असता तो एक विधीसंघर्षग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ठाण्यातील रेकॉर्डची पहाणी केली असता त्याच्यावर चोरी व घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्याने केटीएम दुचाकी दाभा येथील नितीन पॅलेसच्या पार्किंगमधून हॅण्डल लॉक तोडून चोरल्याची कबुली दिली. काही दिवस वापरल्यानंतर ती काटोल येथील चिंचे हॉस्पीटलजवळ बेवारसपणे सोडून दिल्याचे सांगितले. 

इतकेच नाहीतर त्याने 19 फेब्रुवारीला गिट्टीखदान परिसरातून (एमएच 31/ईएक्‍स 3064) क्रमांकाची दुचाकी गोरेवाडा तलावाजवळून चोरल्याचे आणि काही दिवस वापरल्यानंतर ती बेवारस टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चोरीची ती दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेतली. त्याचबरोबर त्याने वाडी परिसरातून महागडी असलेली ब्लसर 220 चोरी करून ती लपवून ठेवल्याची माहिती दिली. 

पोलिसांनी ती बाईकही ताब्यात घेतली. ही कारवाई परीमंडळ क्रमांक दोनच्या पोलिस उपायुक्त विनीता साहू, एसीपी श्रीमती रेखा भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे, संतोष उपाध्याय, इम्रान शेख, संतोष शेंद्रे आणि आशीष बावनकर यांनी पार पाडली. 

हौस संपली बाईक बदलली

प्रेमवीराने तीन महिन्यांत तीन रेसिंग बाईकची चोरी केली. काही दिवस प्रेयसीला बाईकवर फिरवायचा. हौस फिटली की बाईक बेवारस टाकून देत होता. त्यासाठी त्याने मोबाईलमधील यु-ट्‌युबवरून दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडण्याचे धडे गिरवले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गिट्टीखदान पोलीसठाण्याच्या हद्दीतून एक लाख 30 हजारांची दोन वाहने आणि वाडीतून एक लाख रुपयांचे एक वाहन असे एकूण दोन लाख 90 हजार रुपयांचे तीन वाहने जप्त केली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com